PM
फोटो

प्राणप्रतिष्ठेसाठी 'हे' सेलिब्रेटी अयोध्येत!

Swapnil S
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला आणि प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेला अवघे काही तास शिल्लक आहेत
देशभरातील रामभक्तांनी ज्या क्षणाची एवढी वर्षे वाट पाहिली तो अखेर आता जवळ आला आहे.
प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला राजकीय, क्रीडा आणि उद्योगपती मंडळींसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.
प्रभू श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं विविध क्षेत्रातील 2500 मंडळींना निमंत्रण देण्यात आलं आहे.
धनुष, शंकर महादेवन, रणदीप हुड्डा, पवन कल्याण, दिपिका चिखलिया, हेमा मालिनी, ज्युनियर एन्टीआर, मोहनलाल, मनोज मुंतशीर, एसएस राजामौली, रोहित शेट्टी, राजकुमार हिरानी, आयुष्मान खुराना, जॅकी श्रॉफ, राम चरण, अक्षय कुमार, अल्लू अर्जुन, सरोद वादक अमजद अली असे अनेक सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत
बॉलिवूडसह दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील मंडळी मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित असतील. अनेक सेलिब्रिटींचे अयोध्येतील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
भारतीयांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असणार आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अनुपम खेर, अजय देवगन, सनी देओल, हेमा मालिनी, रणबीर कपूर, आलिया भट्ट, कंगना रनौत, मधुर भंडारकर, संजय लीला भन्साळी, चिरंजीवी, रजनीकांत, ऋषभ शेट्टी, यश, प्रभास, मोहनलाल, माधुरी दीक्षित, विकी कौशल, कतरिना कैफ हे सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत.
आज कोणत्याही बॉलिवूड सिनेमाचं शूटिंग होणार नाही. एकंदरीतच बॉलिवूडमध्ये आज लॉकडाऊन असेल. मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आज सुट्टी असणार आहे.

मोठी बातमी! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; दुबार मतदान रोखण्यासाठीही आणलं खास 'टूल'

सातारा जिल्ह्यातील 'राधा' म्हशीचा जगात डंका; सर्वात बुटकी म्हैस म्हणून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद

ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला गती; देशातील सर्वात लांब शहरी बोगदा

कोइंबतूर विमानतळाजवळ गँगरेप प्रकरण; पोलिसांवर हल्ला करून पळण्याचा प्रयत्न करणारे तिघे अटकेत

डॉ. संपदा मुंडे मृत्यू प्रकरण : बेटी पढ़ी, पर बची नहीं... डॉक्टरांचे काम बंद आंदोलन; अधिकाऱ्यांचाही इशारा