रितेशने वडिलांचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. @riteishd/Instagram
फोटो

"मिस यू पप्पा...", विलासरावांच्या आठवणीने रितेश-जेनेलिया भावुक, खास फोटो केले शेअर

आज (१४ ऑगस्ट) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त रितेश – जिनिलीयाने भावुक पोस्ट शेअर केल्या आहेत.

Tejashree Gaikwad
रितेशचं आपल्या वडिलांबरोबर फारच जवळचं नातं होतं. वडिलांबद्दल तो आजही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होतो.
रितेशची पत्नी जिनिलीयाही विलासराव देशमुख यांच्याबद्दल सोशल मीडियावर नेहमी बोलते. विलासराव जिनिलीयाला आपल्या सुनेपेक्षा जास्त आपली मुलगी मानायचे.
वडिलांच्या आठवणीत भावुक होत अभिनेत्याने एक छानसं कॅप्शन देत फोटो पोस्ट केले आहेत.
“माय फॉरएव्हर, माझे सर्वस्व… पप्पा तुमची खूप आठवण येते” असं कॅप्शन देत त्याने हे फोटो पोस्ट केले आहेत.
त्याने लहानपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे.
विलासराव देशमुख हे १९९९ ते २००३ आणि २००४ ते २००८ या काळात महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री होते.
रितेश देशमुखच्या पोस्टवर असंख्य नेटकऱ्यांनी कमेंट्स करत विलासराव देशमुख यांना अभिवादन केलं आहे.
रितेश-जिनिलीयाची दोन्ही मुलं राहिल अन् रियान या दोघांचाही छानसा फोटो रितेशने पोस्ट केला आहे.
रितेशप्रमाणे जेनेलियानेही भावूक पोस्ट केली. यामध्ये, विलासरावांच्या फोटोसमोर त्यांचे दोन्ही नातू बसलेले दिसत आहेत. त्यासोबत, "आजोबा, प्रत्येक दिवशी, प्रत्येक सेकंदाला अन् प्रत्येक क्षणाला आम्हाला तुमची आठवण येते…" असे जेनेलियाने आपल्या मुलांच्या वतीने लिहिले.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश