फोटो

थाटामाटात पार पडला विशाल निकम अन् अक्षया हिंदळकरचा साखरपुडा; अभिनेता म्हणाला "देव खरंच माझ्या बाजूने.."

काल, ८ फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये थाटात 'बिग बॉस मराठी' तिसऱ्या पर्वाचा विजेता, अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर यांच्या साखरपुड्याचा सोहळा पार पडला, जिथे कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हा आनंदाचा क्षण साजरा झाला.

Mayuri Gawade

'बिग बॉस मराठी' तिसऱ्या पर्वाचा विजेता, अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर आता लग्नबंधनात अडकण्याच्या तयारीत आहेत.

काल, ८ फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये थाटात त्यांच्या साखरपुड्याचा सोहळा पार पडला, जिथे कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हा आनंदाचा क्षण साजरा झाला.

साखरपुड्याच्या दोन दिवस आधी, अक्षयाने मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

लाल रंगाच्या पारंपरिक इरकल साडीपासून तयार केलेला इंडो-वेस्टर्न लूक तिने परिधान केला होता, ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

या फोटोंना अक्षयाने “विशाल, सखीच्या मेहंदीत तुझं नाव शोधायला तयार राहा” असा मजेदार कॅप्शन दिले होते .

दरम्यान, विशाल आणि अक्षयाने जोडीने दख्खनचा राजा कोल्हापूरच्या ज्योतिबाचे दर्शन घेतले. या वेळी विशालने देवाकडे "चांगभलं देवा… लक्ष असू दे, साथ राहू दे" अशा भावनिक शब्दांत साकडे घातले.

सध्या त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. "देव खरंच माझ्या बाजूने होता जेव्हा त्याने तुला माझ्यासाठी लिहिलं...", असं सुंदर कॅप्शन देत विशालने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

साखरपुड्याच्या फोटोंमध्ये अक्षयाने हिरव्या रंगाची साधी साडी नेसली होती आणि सिम्पल, सुबक लूक दिसत होता, तर विशालने पिवळ्या आणि नारंगी शेडची शेरवानी परिधान केली होती.

अक्षया आणि विशालच्या या खास क्षणाचे फोटो पाहून चाहतेही आनंदी झाले आहेत. त्यामुळे, आता विशाल त्याच्या ‘सखी’सोबत लग्नगाठ कधी बांधणार?, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन