All Photo Freepik
फोटो

जेवणानंतर शतपावली का करावी? काय आहेत चालण्याचे फायदे?

Kkhushi Niramish
आपल्याकडे जेवणानंतर शतपावली करण्याची पद्धत आहे. यामुळे आरोग्यासाठी अनेक आश्चर्यकारक फायदे होतात. जाणून घेऊ या शतपावली म्हणजे काय? का करावी शतपावली?
शतपावली म्हणजे जेवणानंतर १०० पावलं चालणे.
जेवणानंतर लगेचच बसल्याने किंवा झोपल्याने शरीराला अनेक आजार जडू शकतात. त्यामुळे जेवणानंतर शतपावली करणे उत्तम असते. त्याचे आरोग्याला वेगवेगळे फायदे होतात.
पचन सुधारते जेवणानंतर पचनक्रिया लगेचच सुरू झालेली असते. शरीरातील अन्न व्यवस्थित पचण्यासाठी शतपावली केल्यामुळे मदत मिळते. शतपावली करताना शरीराची हालचाल होते. त्यामुळे पचन सुधारते.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते शतपावली केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.
वजन नियंत्रणात जेवणानंतर शरीराची हालचाल झाल्यामुळे कॅलरीज बर्न होतात. परिणामी चरबी वाढत नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
मूड फ्रेश होतो माणसाचे विचारचक्र कायम सुरू असते. त्याच प्रमाणे ते जेवताना ही सुरू असते. त्यामुळे जेवण केल्यानंतर शतपावली केल्यामुळे विचारांची गती कमी होते. सोबतच शतपावली करताना तुमच्या आवडीचे म्युझिक तुम्ही ऐकू शकता. त्यामुळे मूड फ्रेश होतो आणि फ्रेश वाटते.
हृदय निरोगी राहते हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी चालणे हा अत्यंत फायदेशीर व्यायाम आहे. जेवणानंतर १०० पावले चालल्याने हृदयाच्या कार्याची गती सुधारते. त्यामुळे हृदय निरोगी राहते.
झोप चांगली येते अनेकांना रात्री झोप न येण्याची तक्रार असते. अशा लोकांनी रात्रीच्या जेवणानंतर शतपावली अवश्य करावी. पचन प्रक्रिया सुधारल्याने शरीर जड पडत नाही आणि झोप चांगली लागते.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री