राजकीय

मंत्रिपदाच्या प्रश्नावरुन बच्चू कडू पुन्हा संतापले ; काय म्हणाले?

गेल्या आठवण्यात त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारल्यावर, सहन करण्याची एक मर्यादा असते, ती तुटली की कुणी कुणाचं नसतं, असं म्हटलं होतं

नवशक्ती Web Desk

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सहभागी झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील तसंच भाजपातील देखील काही आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीला कंटाळून भाजपासोबत आल्याने आता राष्ट्रवादीला जवळ केलेल्या केलेल्या भाजपला साथ देणे चुकीचं असल्याचं असल्याची भावना अनेक आमदारांची असल्याचं मत प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली होती.

बच्चू कडू यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. आता महायुतीच्या सरकारमध्ये मात्र त्यांना मंत्रीपद दिलेलं नसल्याने ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. बच्चू कडू यांनी टीव्ही९ या मराठीशी बोलताना त्यांना आमरांमधील नाराजीबाबत विचारलं. यावेळी त्यांनी कोणताही आमदार आस लावून बसलेला नसून आमदार आस लावून बसलेला आहे असं केवळ तुम्हा पत्रकारांना वाटत. आम्ही काय पिशवी घेऊन बसलोय का? वाटून टाकायला मंत्रिपद काय भाजीपाला आहे का? मुळात कोणी पिशवी घेऊन बसणार आहे का? असा प्रतिप्रश्न करत संताप व्यक्त केला.

गेल्या आठवण्यात बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्रिमंडळ विस्तारावर विचारल्यावर सहन करण्याची एक मर्यादा असते, ती तुटली की कुणी कुणाचं नसतं, अशी प्रतिक्रिया दिली होती. तर मी मंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला नव्हता. पण एकंदरीत जी राजकीय व्यवस्था आहे, त्यात कोण कसं अडचणीत येतं, हे मी सांगितलं. असं ते म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याआधी किमान किमान घटक पक्षासोबत चर्चा करायला हवी होती. पण तसं झालं नाही, अशी खंत देखील त्यांनी दोन दिसांपूर्वी व्यक्त केली होती.

Mumbai : तिकीट मागितलं, थेट CBI चं ओळखपत्र दाखवलं; लोकलच्या फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या तोतयाचं बिंग फुटलं

मीरा-भाईंदरमध्ये आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा अखेर दाखल; भाजप पदाधिकाऱ्यांची नावे जाणीवपूर्वक टाळल्याचा गंभीर आरोप

१ फेब्रुवारीपासून सिगारेट, गुटखा महाग; उत्पादन कर वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

पुण्यात युतीबाबत अजित पवार-शिवसेनेचे संकेत; महायुतीतील पेच सोडवण्यासाठी हालचाली

महायुतीचे २२ बिनविरोध; भाजपच्या सर्वाधिक १२, तर शिंदे सेनेच्या ७ उमेदवारांना लाॅटरी; अर्ज छाननीत विराेधकांना फटका