राजकीय

"भुजबळ भाजप आणि काँग्रेसवर भारी", आमदार बच्चू कडू यांचं मोठं विधान

आता ना भाजपा ना काँग्रेस, आता फक्त भुजबळसाहेब हेच ओबीसी नेते आहेत, असं देखील बच्चू कडू म्हणाले

नवशक्ती Web Desk

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते आणि आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षण देण्यास विरोध केला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट न करता त्यांनी टिकणारं स्वतंत्र आरक्षण द्या, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली होती. या भूमिकेनंतर मनोज जरांगे-पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात वादाला सुरुवात झाली.

छगन भुजबळ यांनी अंबड येथील सभेतून उघड आव्हान दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी, अजित पवारांना छगन भुजबळ यांन शांत करावं, अन्यथा मी शांत बसणार नाही, अशी भूमिका घेतली. यावर आता प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी सूचक विधान केलं आहे.

अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी भूमिका एकच आहे. वरिष्ठांच्या सहमतीशिवाय भुजबळ अशाप्रकारे आक्रमक बोलत नाहीत, हे स्पष्ट आहे. अशा आशयाचं सूचक विधान बच्चू कडू यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केलं आहे.

छगन भुजबळ हे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांच नेतृत्व करतायत, असं विधान बबनराव तायवाडे यांनी केलं होतं. आमदार बच्चू कडू यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले, भाजपा आणि काँग्रेस देखील ओबीसींचं नेतृत्व करु पाहत आहे. पण भुजबळ भाजपा आणि काँग्रेसवर भारी पडत आहेत. या दोघांनाही भुजबळांनी मागे टाकलं आहे. आता ना भाजपा ना काँग्रेस, आता फक्त भुजबळसाहेब हेच ओबीसी नेते आहेत.

BCCI कडून महाभियोगची तयारी; कुणकुण लागताच मोहसीन नक्वींनी UAE बोर्डाकडे सुपूर्द केली ट्रॉफी : रिपोर्ट

आजपासून भारत आणि EFTA व्यापार करार अंमलात; पुढील १५ वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार

नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’; ८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार