राजकीय

न्यूज क्लिक आणि काँग्रेसवर भाजपचे गंभीर आरोप ; देशविरोधी अजेंडा राबवत असल्याचा दावा

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतचे आरोप केले आहेत

नवशक्ती Web Desk

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेस आणि न्यूज क्लीक या वेब पोर्टलवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस आणि न्यूज क्लीक वेब पोर्टलचा संबंध असून या वेब पोर्टलकडून देशविरोधी अजेंडा राबवला जात असल्याचा गंभर आरोप अनुराग ठाकूर यांनी केला आहे. ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतचे आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी या पोर्टलला चीनकडून फंडिंग होत असल्याचा दावा देखील केला आहे.

अनुराग ठाकूर पत्रकार परिषद घेत म्हणाले की, राहुल गांधींच्या नकली मोहब्बत की दुकानंमध्ये चीनी सामान स्पष्टपणे दिसू लागलं आहे. इंडिया आघाडीचे नेते आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले तसंच समर्थन करणारे लोक कधीही भारताच्या हिताचा विचार करत नाही. हे लोक भारत कसा कमजोर होईल, भारतातचं कसं नुकसान होईल हाच विचार हे लोक करतात. असे अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप अनुराग ठाकूर यांनी केले.

न्यूज क्लीक वेब पोर्टला चीनकडून फंडींग

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी न्यूज क्लीक वेब पोर्टलवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. चीनच्या ग्लोबल मीडिया संस्थानकडून न्यूज क्लीक वेब पोर्टलला पैसा पुरवण्यात आला असल्याचा दावा ठाकूर यांनी केला आहे. या वेब पोर्टलच्या कार्यालयावर छापे पडले त्यावेळी ही माहिती समोर आली. नेविल राय सिंघम या परदेशी नागरिकाने या पोर्टलला पैसा पुरवला असल्याचं देखील ते म्हणाले.

यावेळी नेविल राय सिंघमला चीन पैसा पुरवत असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. तसंच याचा संबंध कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या प्रोपोगंडा विभागाशी आहे असं सांगत लोक अँटी इंडिया आणि ब्रेक इंडिया कँपेन चालवतात, असा गंभीर आरोप ठाकूर यांनी केला.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव