राजकीय

मिझोराम जनतेसाठी कॉंग्रेस जाहिरनाम्यात सवलतींची बरसात

प्रतिनिधी

नवी दिल्ली : मिझोराम मधील आगामी विधानसभा निवडणूक च्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसने मिझोराममधील जनतेला गॅस सिलेंडरच्या किंमतीपासून ते आरोग्य विम्यापर्यंत अनेक आश्वासनं दिली आहेत. यामध्ये ७५० रुपयांत गॅस, पेन्शन आणि १५ लाखांचा हेल्थ इन्शुरन्स याचा समावेश आहे. मिझोरममध्ये ७ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. मिझोराममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आपल्या जाहीरनाम्याद्वारे सर्वसामान्यांना आकर्षित करण्याचा जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. पेन्शन, स्वस्त दरात गॅस सिलिंडर आणि आरोग्य विमा अशी अनेक आश्वासनं काँग्रेसने दिली आहेत.

तसेच राज्यात कनेक्टिव्हिटी, विमानतळ, वीज आदी चांगल्या पायाभूत सुविधांच्या विकासावरही काँग्रेस सरकार काम करेल, असे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय काँग्रेस सरकार शेतकरी आणि उद्योजकांसाठी स्टार्टअप फंडिंगसाठीही तरतूद करणार असल्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. सरकार स्थापन झाल्यास, काँग्रेस तरुण मिझो उद्योजक कार्यक्रम राबवेल आणि मिझोराममधील तरुणांसाठी एक लाख रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवेल. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सरकारी कर्मचारी नसलेल्या कुटुंबांसाठी १५ लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य विमा संरक्षणास समर्थन देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. असाध्य रुग्णांसाठीही काँग्रेस पाच कोटी रुपयांचे बजेट ठेवणार आहे. तसेच, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन दरमहा २००० रुपयांपर्यंत वाढवले ​​जाईल, असेही जाहीरनाम्यात म्हटले आहे.

७ नोव्हेंबरला होणार निवडणूक

४० सदस्यीय मिझोरम विधानसभेसाठी ७ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंटने काँग्रेसचा पराभव केला होता. मिझोरामसह मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. पाचही राज्यांतील मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे.

उमेदवारच स्वत:च्या मतदानाला मुकले; उमेदवारी एका मतदारसंघात, मतदान दुसऱ्या मतदारसंघात

वादळी पावसाचा २२ केव्हीला फटका; मुंबईत 'या' ठिकाणी पाणीपुरवठा बंद

Mumbai Hoarding Collapse: घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना; मृतांचा आकडा वाढला

सुशील कुमार मोदी यांचे निधन

मुंबईतील बेकायदा होर्डिंग BMC च्या रडारवर; होर्डिंग्जची झाडाझडती घेण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश