राजकीय

danish ali: काँग्रेस सोबत वाढती जवळीत भोवली; खासदार दानिश अली बसपामधून निलंबीत

भाजपा खासदार रमेश बिधुडी यांनी दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर राहुल गांधी यांनी दानिश अली यांची त्यांच्या निवास्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली होती.

नवशक्ती Web Desk

बसपा अध्यक्ष मायावती यांनी खासदार दानिश अली यांना पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पक्षातून निलंबित केलं आहे. अली यांची काँग्रेससोबत जवळीत वाढल असल्याचं बघून ही कारवाई करण्यात आली आल्याचं सांगितलं जात आहे.

बसपा खासदार दाशिन अली हे अनेक मुद्यांवर काँग्रेस सोबत दिसत होत. याच बरोबर काँग्रेस देखील अनेकदा अली यांच्यासोबत असल्याचं दिसत होतं. पक्षाने बजावून देखील अली यांची काँग्रेससोबतची जवळीक काही कमी न झाल्याने मायावती यांनी ही कारवाई केली आहे.

भाजपा खासदार रमेश बिधुडी यांनी दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर राहुल गांधी यांनी दानिश अली यांची त्यांच्या निवास्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली होती. या भेटदरम्यान काँग्रेसचे महासचिव केसी वेणूगोपाल आणि खासदार प्रतापगढी देखील उपस्थित होते. या भेटीनंतर आपण एकटे नाहीत, अशी प्रतिक्रिया दानिश अली यांनी दिली होती.

राहुल गांधी हे माझा आत्मविश्वास वाढविण्यासाठी इथे आले होते. या गोष्टी मनाला लावून घेऊ नका, आपल्या आरोग्याची काळजी घ्या, या त्यांच्या बोलण्यावरुन मला दिलासा मिळाला आहे. तसंच मी एकटा नाहीए असं वाटले आहे, असं दानिश म्हणाले होते. यामुळे मायावती नाराज झाल्या होत्या. चंद्रयान३ बाबात चर्चेवेळी बिधुडींनी दानिश यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापली होती. भाजपाने यावरुन बिधुडींना कारणे दाखवा नोटीस देखील बजावली होती.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी