राजकीय

मुंबईत 'ईडी'ची छापेमारी; देवेंद्र फडणवीस म्हणतात...

खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सुजीत पाटकर यांच्या मालमत्तेवर देखील छापा टाकण्यात आला आहे

नवशक्ती Web Desk

ईडीने मुंबईत १५ ठिकाणी छापेमारी केली. कोरोना केंद्रांसाठी दिलेल्या कंत्राटातील कथित गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सुजीत पाटकर यांच्या मालमत्तेवर देखील छापा टाकण्यात आला आहे. तसंच एका सनदी अधिकऱ्याच्या ठिकाणावरही छापा मारण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रसार माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, या प्रकरणी नेमकी काय कारवाई झाली हे मला माहिती नाही. पण ज्यावेळी मुंबईत महापालिकेमध्ये कोविड सेंटर्स सुरु करण्यात आले. त्यानंतर कोविड सेंटरमधील घोटाळा बाहेर आला होता, तेव्हा धक्कादायक माहिती बाहेर आली होती. कोणत्याही कंपन्या तयार झाल्या होत्या. लोकांच्या जीवाशी खेळण्यात आलं होतं. पुण्यात तर एका पत्रकाराचा मृत्यू झाला. त्यामुळे यासंदर्भातील चौकशी चालली आहे. ही चौकशी कुठपर्यंत पोहचली. या छाप्यात काय मिळालं आहे. हे ईडी सांगू शकेल. मला माहिती नसल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, "या प्रकरणात ज्या लोकांचे कनेक्शन असतील त्यांची चौकशी सुरु असेल. ईडी अधिकारी याबाबत अधिकृत माहिती देऊ शकतील", असं त्यांनी म्हटलं आहे."

ईडीने मुंबईत १५ ठिकाणी छापेमारी केली आहे. यात संजय राऊत यांचे जवळचे असणारे सुजीत पाटकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांचा देखील समावेश आहे. सुजीत पाटकरांसह तिघांविरोधात आझाद मैदान पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी ३८ कोटी रुपयाचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली होती.

Mumbai : मुंबई पोलिसांची फटाक्यांवर कडक नियमावली; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

पेंग्विनची भुरळ कायम! राणीच्या बागेला तीन वर्षांत ३५.३६ कोटींचा महसूल

भटक्या श्वान-मांजरींसाठी १२ कोटींचा खर्च अपेक्षित; नसबंदी, रेबीज लसीकरण मोहीम राबविणार

दिवाळी हंगामात विमान भाडे ३०० टक्क्यांनी वाढले

देशातील न्यायालयात आठ लाख अंमलबजावणी आदेश प्रलंबित; सर्वोच्च न्यायालयाची माहिती