राजकीय

स्टार प्रचारकांना लगाम घाला! निवडणूक आयोगाची भाजप, काँग्रेसला सूचना

जात, समाज, भाषा आणि धार्मिक धर्तीवर प्रचार करण्यापासून दूर राहा आणि आचारसंहितेचे तंतोतंत पालन करा...

Swapnil S

नवी दिल्ली : जात, समाज, भाषा आणि धार्मिक धर्तीवर प्रचार करण्यापासून दूर राहा आणि आचारसंहितेचे तंतोतंत पालन करा, अशी सूचना निवडणूक आयोगाने बुधवारी भाजप आणि काँग्रेसला केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या बंसवारामध्ये समाजात फूट पाडणारे भाषण केल्याची तक्रार विरोधकांनी केली होती , त्यानंतर आयोगाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर नोटीस बजावली होती. त्याला नड्डा यांनी दिलेले उत्तर निवडणूक आयोगाने अमान्य केले होते आणि पक्षाच्या स्टार प्रचारकांना धार्मिक आणि जातीय प्रचार करण्यापासून दूर राहण्यास सांगावे, अशी सूचना नड्डा यांना केली होती.

दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा बचाव नाकारला

नड्डा यांच्याबरोबरच आयोगाने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावरही नोटीस बजावली होती. निवडणूक आयोगाने खर्गे यांचा बचावही नाकारला असून, दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या अध्यक्षांना आपल्या स्टार प्रचारकांना योग्य सूचना देण्यास सांगितले आहे.

Mumbai : इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी सेवा आजपासून सुरू; एक किमीला १५ रुपये भाडे; राज्य परिवहन प्राधिकरणाची परवानगी

पाकिस्तानची भारताविरोधात तक्रार; लढतीनंतर हस्तांदोलन न केल्यामुळे नाराजी; सामनाधिकाऱ्यावरही कारवाईची मागणी

SRA ला फटकारले! खासगी मालकीची जमीन झोपडपट्टी कशी? प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश

राजकीय पक्षांच्या कार्यालयांना ‘पॉश’ कायद्यातून वगळले; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

सर्व नियमांचे पालन, बदनाम करू नका; ‘वनतारा’ला सुप्रीम कोर्टाची क्लीनचिट