राजकीय

शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी कृषि नियंत्रण कक्षाची स्थापना

प्रतिनिधी

खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते आदीबाबत उद्भवणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी तसेच काळाबाजार व साठेबाजीला आळा बसण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत विभागस्तरावर तसेच प्रत्येक जिल्ह्यात निविष्ठा तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आला आल्याची माहिती कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक अंकुश माने यांनी दिली.

बियाणे, खते, किटकनाशके व इतर बाबींसंदर्भात काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास येताच थेट नियंत्रण कक्षात तक्रार करता येणार आहे. खरीप हंगामाला काही दिवसांतच सुरूवात होणार आहे. बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. अशावेळी शेतकऱ्यांना खरीप हंगामावेळी येणाऱ्या अडचणींबाबत तक्रारी करता याव्यात यासाठी विभागस्तरावर तसेच जिल्हास्तरावर निविष्ठा तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तक्रार निवारण कक्षाचा भ्रमणध्वनी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

n विभागीय कार्यालय, ठाणे ८६९१०५८०९४,toqcthanediv@gmail.com

n ठाणे- ७०३९९४४६८९, dsaothane.2013@rediffmail.com

n पालघर- ९४०३८२१८७०,dsaopalghar@rediffmail.com

n ·रायगड- ९५०३१७५९३४, dsaoraigad@gmail.com

n रत्नागिरी- ८६६८९७२३३७dsaortn@rediffmail.com

n ·सिंधुदूर्ग- ९४०४३०५८४८saosindhu@gmail.com

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Terrorist Attack in Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये हवाई दलाच्या वाहनावर हल्ला; एक जवान शहीद, चार जखमी!

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

World Laughter Day 2024: हसत राहा! हसल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण