राजकीय

इंडिया आघाडी करते ६० टक्के भारताचे प्रतिनिधित्व -राहुल गांधी

राहुल गांधी हे मिझोरामची राजधानी ऐझवाल येथे निवडणूक प्रचारासाठी आले होते.

Rakesh Mali

ऐझवाल : देशाच्या ६० टक्के भागाचे प्रतिनिधित्व आपली इंडिया आघाडी करते. हे प्रमाण भाजपपेक्षा अधिक आहे. आपली इंडिया आघाडीच देशाचे इंडिया संकल्पनेचे संरक्षण करेल, असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मिझोरामची राजधानी ऐझवाल येथे पत्रकारांना संबोधित करताना केले. ते निवडणूक प्रचारासाठी दोन दिवसांच्या दौऱ्यावर येथे आले आहेत.

राहुल गांधी पुढे म्हणाल्या की, मिझोराममधील दोन प्रमुख पक्ष एमएनएफ आणि विरोधी पक्ष झेडपीएम यांच्यामुळेच भाजप आणि आरएसएस या ख्रिश्चनबहुल राज्यात पाय रोवू शकले आहेत. आपला पक्ष सत्तेत आला तर ज्येष्ठांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन दिली जार्इल. तसेच ७५० रुपयांत गॅस सिलिंडर दिला जार्इल, असे आश्वासन देखील गांधी यांनी यावेळी दिले. मिझोराममध्ये ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

इंडिया आघाडी देशाच्या लोकशाहीचे संरक्षण करेल. घटनेच्या चौकटीत राहून धर्म व संस्कृती यांचा विचार न करता जनतेच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करेल. जेणेकरून ते या देशात शांततेने जगू शकतील. आरएसएसचा आणि इंडिया आघाडीचा देशाबाबतचा दृष्टिकोन भिन्न आहे. आम्ही सत्तेच्या विकेंद्रीकरणावर भर देतो. याउलट भाजपचे सर्व निर्णय दिल्लीतूनच घेतले जातात. येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यात सत्तेत येर्इल. छत्तीसगडमधून आम्ही भाजपला सत्तेतून खाली खेचले आहेच आणि आता पुन्हा त्यांना हरवणार आहोत. मध्य प्रदेशातही आम्ही त्यांचे पतन करणार आहोत. मागील निवडणुकीत राजस्थानात आम्ही भाजपला पराभूत केले होते. यावेळी आम्ही त्याची पुनरावृत्ती करणार आहोत. इशान्य भारतातही आम्ही भाजपला पराभूत करणार आहोत. काँग्रेसला कुणी कमी लेखू नये. असे गांधी यांनी म्हटले आहे. या देशाचे पाया काँग्रेसनेच रचला असून वेळोवेळी त्याचे रक्षण देखील काँग्रेसनेच केले आहे, पण भाजपला देशातील सर्व संस्थांना ताब्यात घ्यायचे आहे. इशान्य भारतातील अनेक राज्यांत भाजप आणि आरएसएसचे हल्ले सोसावे लागत आहेत. यामुळे त्यांच्या धार्मिक आणि भाषिक मूल्ये धोक्यात आली आहेत.

आरएसएसला वाटते की भारतावर एकाच विचारसरणीचे राज्य असावे आणि आमचा नेमका यालाच विरोध आहे. आम्हाला वाटते की, मिझोरामच्या जनतेने आपल्या भविष्यासाठी आता निर्णय घ्यावेत. त्यांना सर्वप्रकारे सुरक्षित आणि सुस्थितीत पाहावे अशीच आमची इच्छा आहे. मिझोरामवर थेट दिल्लीतून राज्य व्हावे असे आम्हाला वाटत नाही. आम्ही जनतेसोबत सत्ता वाटण्यावर विश्वास ठेवतो. भाजपने येथे पाय रोवण्यासाठी एमएनएफ आणि झेडपीएम या मंचाचा वापर करून घेतला. आता आगामी निवडणूक ही मिझोरामचा स्वातंत्र्य, परंपरा व धर्मरक्षणाचा स्वत:चा लढा आहे, असे विधान राहुल गांधी यांनी मिझोरामच्या राजधानीत बोलताना केले

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक