राजकीय

"हा अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा डाव तर नाही ना?" शिंदेंच्या आजारपणावर 'या' नेत्यांने व्यक्त केली शंका

नवशक्ती Web Desk

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप सोबत सत्तेत शामील होतं मंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून एकनाथ शिंदे यांना पायउतार करुन अजित पवारांना मुख्यमंत्रची केलं जाईल. याबाबतच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. अनेक बड्या नेत्यांनी देखील याबाबत भाष्य केलं होतं. अजित पवार यांना मुख्यंमंत्री पदाचा शब्द दिला असल्याने ते सत्तेत सामिल झाले, अशा चर्चा अधून मधून कामावर पडत असतात. आता राज्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शंका व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलून अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा डाव तर नाही ना? अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आजारपणाचं कारण देत मुख्यमंत्री पदावरून दुर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी शंका आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा डाव तर नाही ना? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

वडेट्टीवार म्हणाले की, आरोग्याच कारण देत त्यांना अॅडमिट करायचं. आरोग्याचं कारण पुढे करत त्यांचा राजीमाना घ्यायचा आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचा प्रयत्न तर सुरु नाही ना? अशी शंका घेण्यासाठी पुर्णता वाव आहे. कारण आता दोघांची जी भूमिका आहे, त्यातून दिसून येत आहे. अधिवेशनात देखील शिंदे यांचा सहभाग आणि उपस्थिती कमी होती. त्याचं बोलणं ही कमी होतं. यानंतर सामाजिक कार्यक्रमांना जाणं टाळणं, आराम करण्यासाठी बाहेर जाणं, मग तब्येतीची काळजी घेणं. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राज्याला त्यांची काळजी असते. मुख्यमंत्री केवळ एका पक्षाचे नाहीत, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. यामुळे याचा खुलासा होणं अपेक्षित आहेत. असं वडेट्टीवार म्हणाले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त