संग्रहित छायाचित्र
राजकीय

"वोटचोरीनंतर आता चक्क मतदारांची पळवापळवी"; जितेंद्र आव्हाडांचा निवडणूक आयोगावर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी "निवडणूक आयोगाने मतदारांची पळवापळवी सुरू केली", असे म्हणत आयोगावर टीका केली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

राज्यातील २६२ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदासाठी आणि ६०४२ सदस्यपदांच्या जागांसाठी मंगळवारी (दि.२) मतदान पार पडले. आता सर्वांचे लक्ष २१ डिसेंबरच्या निकालाकडे लागले आहे. अशातच, निवडणूक आयोगाकडून होणाऱ्या अनेक चुका लक्षवेधी ठरत आहेत. मतदानानंतर अनेक बोगस मतदारांचा पर्दाफाश झाला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी "निवडणूक आयोगाने मतदारांची पळवापळवी सुरू केली", असे म्हणत आयोगावर टीका केली आहे.

सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले झालेल्या प्रशासनाने...

जितेंद्र आव्हाड यांनी आज (दि. ३) X च्या माध्यमातून सांगितले, "इम्रान शेख हा तरूण राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचा पिंपरी - चिंचवड शहराचा युवक अध्यक्ष आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ आणि ९ मधून त्याचे वडील युनूस शेख आणि आई राबिया शेख हे दोघे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. किंबहुना, ते दोघेही प्रबळ अन् विजयी होऊ शकतात, एवढी ताकद त्यांची आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले झालेल्या प्रशासनाने या दोघांचीही नावे अनुक्रमे इंदापूर आणि शिरसुफळ- बारामतीच्या यादीत वर्ग केले आहेत."

नवरा इंदापूर आणि बायको बारामतीत...

पुढे ते म्हणाले, "गेले ३५ वर्षे पिंपरी-चिंचवडमध्ये मतदान करणाऱ्या या दाम्पत्याची नावे कोणताही अर्ज केलेला नसताना इथून हटवलीच कशी गेली? सर्वात विचित्र म्हणजे, नवरा इंदापूर आणि बायको बारामतीच्या मतदारयादीत दाखविण्याचा प्रताप निवडणूक आयोगाने केला आहे. निवडणूक आयोग वोटचोरी तर करतेच; आता चक्क मतदारांची पळवापळवी सुरू करण्यात आली आहे. असे जर असेल तर या लोकशाहीला काही अर्थ उरला आहे का?" असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

आयोग उत्तर देणारच नाही पण, सत्ताधारी...

"निवडणूक आयोग या प्रश्नाचे उत्तर देणारच नाही. पण, सत्ताधारी लगेचच उत्तरे द्यायला पुढे येतील, यातच सर्वकाही आले." असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागले. आता निवडणूक आयोग किंवा सत्ताधारी यापैकी कोणी यावर उत्तर देतंय का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

नावे कुणाच्या दबावात ट्रान्सफर केली? आमदार रोहित पवारांचा सवाल

रोहित पवार म्हणाले, "इम्रान शेख यांचे वडील युनूस शेख व आई राबिया शेख यांनी कुठल्याही प्रकारचा अर्ज केला नसताना नावे कुणाच्या दबावात आणि कुणाच्या इशाऱ्यावर ट्रान्सफर करण्यात आली? स्थानिक BLO अधिकारी यांनी कुणाच्या दबावात काम केले? हे समोर यायला हवे आणि तात्काळ युनूस शेख व राबिया शेख यांची नावे त्यांच्या जुन्या पत्त्याप्रमाणे पुर्ववत करण्यात यावीत, ही विनंती!"

‘रेरा'चे अधिकारी, न्यायाधिकरण फ्लॅट वादाचा फैसला करु शकत नाहीत; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा

राज्यभरात दीड कोटींची रोकड जप्त; १५ जणांवर गुन्हा दाखल; निवडणुकीत आचार संहितेचे उल्लंघन भोवणार

मुंबईकरांनो सावधान! अरबी समुद्र खवळणार, उंच लाटा उसळणार; आजपासून ३ दिवस मोठी भरती; किनारी जाणे टाळा - BMC चे आवाहन

शेतकऱ्यांसाठी केंद्राची मदत लवकरच; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

'बोलो जुबां केसरी'...नववधूची स्टेजवरून शाहरूख खानकडे अनोखी डिमांड; नेटकरी घेतायेत मजा - बघा Video