राजकीय

नारायण राणे ठाकरे गटावर भडकले ; म्हणाले, "...तर मात्र तुमची औकात काढणार"

अरविंद सावंत यांनी श्रीकांत शिंदेंना उत्तर देत हे पळपुटे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? असा खोचक सवाल केला होता.

नवशक्ती Web Desk

आज राज्यसभेत केंद्रीय मंत्री नारायाण राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. यावेळी सावंत यांच्यावर बोलताना राणे यांनी पार 'औकात' शब्दांचा उल्लेख केला.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलेलं भाषण ऐकून मला महाराष्ट्राच्या विधानसभेत बसलो आहे असं वाटलं असं नारायण राणे म्हणाले. सावंत यांनी श्रीकांत शिंदेंना उत्तर देत हे पळपुटे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? असा खोचक सवाल केला होता.

यावेळी घंटा बडवणारं हिंदुत्व नको तर अतिरेक्यांच्या विरोधात बंदूक हातात घेणारं हिंदुत्व आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं असल्याचं सावंत म्हणाले. यावेळी शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार जुंपली. यावेळी नारायाण राणे यांनी अरविंद सावंत यांच्यावर हल्लाबोल केला. शरद पवार यांच्यासोबत गेले त्यावेळी हिंदुत्व आठवलं नाही का? पक्ष वाढवायला पण ताकद लागले. मी पक्ष सोडल्यानंतर २०० लोकांनी प्रोटेक्शन दिलं होतं. असं राणे म्हणाले.

तसंच यांची पंतप्रधानांवर बोलण्याची औकात नाही. तुम्ही मोदी-शाहांविरोधात बोललात तर मी तुमची औकात काढेलच असंही राणे म्हणाले.

जागावाटपाचा निर्णय दोन दिवसांत - मुख्यमंत्री; शिंदे सेनेची ६० जागांवर बोळवण?

श्रमिकांच्या जगण्यातला राम संपला

‘महाराष्ट्रात दबावाचे राजकारण’

आजचे राशिभविष्य, २० डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

IND vs SA: मालिका विजयाची आज संधी; अहमदाबाद येथे भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेशी पाचवा टी-२० सामना