राजकीय

Sanjay Raut: "पिक्चर अभी बाकी है..", संजय राऊत यांच्याकडून मकाऊच्या कसिनोतील आणखी एक व्हिडिओ पोस्ट

आणखी २७ फोटो आणि ३ व्हिडिओ आपल्याकडं असल्याचा दावा देखील राऊत यांनी केला आहे.

नवशक्ती Web Desk

सोशल मीडियावर सध्या चांगलाच धुमाकुळ पाहायला मिळत आहे. नुकतंच संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विट केल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नुकतेच कौटुंबिक पर्यटनासाठी मकाऊच्या दौऱ्यावर होते. तिथला त्यांचा कसिनोमधला एक फोटो नुकताच संजय राऊतांनी ट्विट केला होता.

यावरुन संपूर्ण राज्यातलं राजकारणचं चांगलंच पेटलं असताना आता त्यांनी इथली एक व्हिडिओ क्लीपही एक्स या सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. तसंच 'पिक्चर अभी बाकी है' असं म्हणत आणखी २७ फोटो आणि ३ व्हिडिओ आपल्याकडं असल्याचा दावा देखील राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यात केवळ कसिनोतील इंटिरियर दिसत आहे. त्यात प्रत्यक्ष कोणत्याही व्यक्तीची प्रतिमा दिसत नाही. कसिनोत गँगवेमधून चालताना मोबाईलच्या कॅमेऱ्यात नकळत हा व्हिडिओ काढल्याचं स्पष्टपणे दिसतं आहे. केवळ ६ सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. यात त्यांनी 'मकाऊ की रातें..पिक्चर अभी बाकी है' असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर या पोस्टमध्ये राऊतांनी आपल्याकडं मकाऊमधील २७ फोटो आणि ३ व्हिडिओ असल्याचा दावा केला आहे. त्यातील एक व्हिडिओ त्यांनी आज ट्विट केला. संजय राऊत आता पुढं नेमक कोणतं पाऊल उचलतील याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. तसंच भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येत हे पाहण देखील महत्वाचं ठरणार आहे.

ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी