राजकीय

Sharad Pawar: अजित पवारांच्या टीकेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "काहींनी टीका केली पण..."

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना थेट लक्ष केलं होतं

नवशक्ती Web Desk

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचं कर्जतमध्ये वैचारिक मंथन शिबिर पार पडलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना थेट लक्ष केलं होतं. शरद पवार यांनी मात्र यावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता शरद पवार यांनी पहिल्यांदा यासर्वांवर भाष्य केलं आहे. काहींनी टीका-टिपप्पणी केली. पण, खूप विचार करण्याची गरज नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे पदाधिकाऱ्यांना संबोधिक करताना ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, कुणी पक्ष सोडून गेलं असेल, तर चिंता करण्याची गरज नाही. शेवटी जनतेत जे भूमिका मांडून पाठिंबा घेण्यासाठी यशस्वी होतात, जनताही त्यांच्याबरोबर राहते. तेच महाराष्ट्रत पाहायला मिळेल. महाष्ट्रात नवीन लोकांना संधी देण्याची वेळ आली आहे. ही युवकांची संघटना मजबूत करु शकलो, तर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची एक फळी मोठ्या मतांनी निवडून येली, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले, टीका-टिप्पणी केली. बाहेर पडलेल्यांनी पक्ष नेण्याचा प्रयत्न केला. पण खूप विचार करण्याची गरज नाही. जनता प्रश्न विचारेल म्हणून लक्ष विचलित करण्यात टीका केली जाते. सत्ता येते जाते. मात्र, जनता तुम्ही कुठून निवडून आला, तुमचं पक्षचिन्ह तुमचा कार्यक्रम याचा विचार करते, त्यामुळे महाराष्ट्रात जागृत जनता आहे, तोपर्यंत परिवर्तन करण्याची धमक समाजात आहे. आपल्याला परिवर्तनाचा कार्यक्रम घेऊन पुढे जायचं आहे., असं त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं.

द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह पोस्टसाठी आचारसंहिता तयार करा! सुप्रीम कोर्टाचे केंद्र, राज्यांना निर्देश

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार

मुंबईतील बेकायदा बांधकामांचे वर्गीकरण करा! अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा

हरयाणा, गोवा, लडाखला मिळाले नवे राज्यपाल

बोइंगच्या विमानांचे ‘फ्यूएल स्वीच’ तपासा; DGCA चे आदेश