राजकीय

फ्लेक्सवर फोटो वापरण्यावरुन शरद पवारांची अजित पवार गटाला तंबी ; म्हणाले..

नवशक्ती Web Desk

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना घेत भाजपशी हातमिळवणी केली. यावेळी पार पडलेल्या शपथविधीनंतर त्यांनी राज्यभर लावण्यात येणाऱ्या पोस्टरवर शरद पवार यांचे फोटो लावा, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी माझे फोटो लावू नयेत, अशी तंबीच शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिली आहे. यावेळी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या कोणत्याही नेत्याचा फोटो प्लेक्सवर वापरायचा नाही, असा आदेश शरद पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांचे फोटो फ्लेक्सवर न लावण्याचे आदेश शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी केलेल्या बंडानंतर शरद पवार यांनी चांगलीच कंबर कसली आहे. पक्षातून गेलेल्या नेत्यांविरोधात मैदानात उतरुन जोरदार लढाईची करण्याचा इशारा पवार यांनी दिला आहे. शरद पवार यांनी येणाऱ्या निवडणुकीत अजित पवार यांच्या गटाविरोधात सामोरे जायचा निर्णय पवारांनी घेतल्याचं सागंण्यात येत आहे. आठ तारखेला सुरु नाशिकपासून सुरु होणाऱ्या दौऱ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आदेश कार्यकर्त्यांना शरद पवारांनी दिली आहे.



अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना होर्डिंगवर शरद पवार यांचे फोटो लावण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याला विरोध दर्शवला आहे. यावेळी शरद पवारांना शरद पवारांचा फोटो लावण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी भूमिका घेतली. दरम्यान, अजित पवार यांनी आज उद्धघाटन केलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त