राजकीय

"काही पुरोगामी नेत्यांनी जातीयवादी पिलावळी तयार केल्या, त्या आता....", गोपीचंद पडळकरांचा रोख कोणाकडे?

नवशक्ती Web Desk

महाराष्ट्रात मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत आहेत. दुसरीकडे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसींमधून देऊ नका, अशी मागणी ओबीसी नेत्यांकडून केली जात आहे. यासाठी ओबीसींकडून देखील सभांचं आयोजन केलं जात आहे. तर राज्यातील धनगर समाज देखील आरक्षणाची मागणी करत आंदोलन करत आहे. असं असताना आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाव न घेतला मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे.

जातीयवादी पिलावळ आरक्षण मागत आहे. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नावही घेण्यास तयार नाही, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. धनगर आरक्षणासाठी न्यायालय, रस्त्यावर लढाई सुरु असतानाच सरकारकडेही पाठपुरावा सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आम्हाला आरक्षण दिलं होतं, असं देखील पडळकर म्हणाले.

ते पुढे बोलताना म्हणाले की, "काही पुरोगामी नेत्यांनी जातीयवादी पिलावळ तयार केल्या आहेत. ही पिलावळ आरक्षण मागत आहे. पण ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करत नाहीत. अथवा बाबासाहेबांचं नावंही घेण्यास तयार नाही. मात्र, यांना आरक्षण पाहिजे...असं कसं चालेल?, ७० वर्षे आमच्यावर अन्याय केला गेला. अनेकजण, आयएसएस, आमदार, खासदार झाले असते. पण, यापासून आम्ही मुकलो आहोत. आता आमची एकजूट झाली आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

जरांगे यांचं प्रत्युत्तर

गोपीचंद पडळकर यांनी नाव न घेता केलेल्या टीकेवर मनोज जरांगे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, "मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो. ते काहीही बोलतात. त्यांनी पाहिलं नसेल, पण मी ठिकठिकाणी बाबासाहेबांच्या स्मारकाचं दर्शन घेतो. महाडला देखील मी जाऊन आलोय"

मंत्री छगन भुजबळ महायुतीवर नाराज? गिरीश महाजन भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

पुणे विमानतळावर अपघात; 'टग ट्रॅक्टर'ला धडकले एअर इंडियाचे १८० प्रवाशांनी भरलेले विमान

घर खरेदी करताय? 'या' ५ गोष्टींकडे द्या लक्ष, नाहीतर येईल पश्चातापाची वेळ

फक्त बॉलिवूडकरच नाही तर 'या' लोकांनीही लावली 'कान्स २०२४'ला हजेरी

गोल्डन चान्स! या फेमस Electric Scooter वर मिळतोय तब्बल १० हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, जाणून घ्या डिटेल्स