राजकीय

निवडणुकीच्या रिंगणात क्रीडापटूंना संमिश्र यश!

Swapnil S

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या रणागंणात यंदा क्रीडापटूंनीसुद्धा आपले नशीब आजमावले. यामध्ये क्रिकेटपटूंनी प्रामुख्याने दणदणीत यश संपादन केले, तर अन्य क्रीडापटूंच्या पदरी मात्र निराशा पडली.

भारताचा माजी अष्टपैलू युसूफ पठाणने अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसकडून बहरामपूर येथे निवडणूक लढवली. काँग्रेसच्या अधिर रंजनविरोधात पठाणने ६० हजारांहून अधिक मतांच्या फरकाने दमदार विजय नोंदवला. त्याचा भाऊ इरफान पठाणनेसुद्धा याविषयी त्याचे अभिनंदन केले. त्याशिवाय १९८३च्या विश्वविजेत्या भारतीय संघातील किर्ती आझाद यांनी दुर्गापूर विभागातून निवडणूक लढवताना जवळपास १ लाखांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांच्याविरोधात भाजपचे दिलीप घोष होते.

पॅरालिम्पिकपटू देवेंद्र झझारियाला मात्र राजस्थानमध्ये भाजपकडून निवडणूक लढवताना पराभव पत्करावा लागला. भालाफेकपटू देवेंद्रला काँग्रेसच्या राहुल कसवान यांनी ७० हजार मतांनी पराभूत केले. तसेच माजी हॉकीपटू दिलीप कुमार तिर्की यांना ओदिशा येथे बिजू जनता दलाकडून निवडणूक लढवताना भाजपच्या जुआल ओराम यांनी धूळ चारली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस