राजकीय

उद्धव ठाकरे यांच्या पक्षामुळेच मुंबई महापालिकेच्या निडवणुका लांबल्या - देवेंद्र फडणवीस

नवशक्ती Web Desk

मुंबईसह मराराष्ट्रातील इतर महापालिकांच्या निवडणुका लांबल्याचा आरोप भाजप सरकारवर केला जातो. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टीकरण दिलं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूका आम्ही लांबवल्या नाहीत. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने लांबवल्या असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ठाकरे गटाने अनेक याचिका दाखल केल्यानेच मुंबई महापालिकेच्या निवडणूका लांबल्या असल्याचं फडणवीस म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये बीएमसीच्या निवडणुका होतील, असा अंदाज देखील त्यांनी वर्तवला आहे.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, "निवडणुका आम्ही लांबवलेल्या नाहीत. आम्हालाही वाटतंय निवडणुका व्हाव्या. ठाकरे गटाने भरपूर याचिका दाखल केल्या आहेत. आरक्षणाबाबतची एक याचिका सुद्धा दाखल आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सर्व याचिका एकत्र करुन स्टेटस को दिला आहे. या स्टेटस कोमुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. स्टेटस को हटून निकाल येईल. त्यावेळी निवडणुका होतील", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

याविषयी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धवजी तुम्ही निवडणुका का घेत नाहीत असं बोलता तेव्हा मला आश्चर्च वाटतं. तुम्ही दाखल केलेल्या याचिका मागे घ्या, स्टेटस को हटेल. दोन्ही बाजूने का बोलता? असं देखील ते म्हणाले.

यावेळी बोलताना त्यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुका शिवसेनेसोबत (शिंदे गट) लढणार असल्याचं सांगितलं. तसंच जेपी नड्डा यांनी दिलेला मुंबई १५० हा आमचा नारा कायम आहे. मुंबई जिंकणार आणि चांगल्या पद्धतीने जिंकणार असल्याच निर्धार त्यांनी फडणवीस यांनी केला. हिंदुत्व हा आमच्या निवडणुकीचा मुद्दा नसून ती आमची विचारधारा असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्दयावर मत मागत नसून विकासाच्या मुद्दावर मागतो. मागच्या निवडणुकीत आम्ही मोठी मुसंडी मारली होती. त्यावेळी संपूर्ण प्रचारातील भाषणात मी विकासाचा मुद्दा मांडत होतो, असं देखील फडणवीस यांनी सांगितलं. ANI या वृत्तसंस्थेच्या पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त