राजकीय

"मजबूत सरकार आहे, तर पुन्हा राष्ट्रवादी चोरण्याची काय गरज होती?" उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

नवशक्ती Web Desk

ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. यवतमाळमधील पोहरादेवीचं दर्शन घेऊन त्यांनी आपल्या विदर्भदौऱ्याची सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी दिग्रस येथील सभेत भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला. भाजपा हा बाजार बुणग्यांचा पक्ष झाला आहे. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरी, भाऊसाहेब फुंडकर यांनी मेहनकर करुन हा पक्ष वाढवला. पण आता बाजार बुणगे येत असून भ्रष्टाराचाने माखलेल्यांना भाजपात घेतलं जात आहे. अशी टीका उद्दव ठाकरे यांनी भाजपवर केली.

यावेळी त्यांनी राजकारणात फोडाफोडी होत असते. भुजबळ आपल्यात होते, नंतर ते राष्ट्रवादीत गेले. आता तिकडे गेले. पण पक्ष संपवून टाकण्याची वृत्ती आली असून ही वृत्ती संपवण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी सध्या मत कोणालाही द्या सरकार आमचचं येणार असं चाललं आहे. असं म्हणत पूर्वी मतपेटीतून सरकार जन्माला याचचं. आता खोक्यातून जन्माला येतं, अशी टीका केली.

आपल्याकडचे 40 आमजदार भाजपाकडे गेले, त्यात अपक्षांचा देखील समावेश आहे. 160 की 165 जणांचं मजबूत आहे. तर, पुन्हा राष्ट्रवादी चोरण्याची काय गरज होती? असा सवाल देखील केला. तसंच अमित शाहांबरोबर अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असं ठरलं होतं. असं देखील ठाकरे म्हणाले.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा