राजकीय

"भाजपच्या एकाही नेत्याची ईडी चौकशी का होत नाही?", आमदार बच्चू कडूंचा भाजपला सवाल

शिंदे गटाच्या नेत्यांमागे ईडीची चौकशी सुरु होती. पण ते आता सत्तेत आले आहेत, असंही ते म्हणाले

नवशक्ती Web Desk

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून फक्त विरोधी पक्षातील नेत्यांची चौकशी केली जाते. असा आरोप विरोधी पक्ष सतत करत असतात. आता मात्र महायुतीतील एका नेत्याने याबाबत प्रश्न उपस्थित केल्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे. गेल्या काही वर्षात ईडी एकाही भाजपच्या नेत्यावर कारवाई केल्याचं माहिती नाही. यावरुन प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी थेट भाजपा सवाल केला आहे. भाजपच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी का केली जात नहाी. याचं उत्तर भाजपने द्यायला हवं, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. ते 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

मराठा आक्षणावरुन राज्यात सुरु असलेल्या राजकाणावर प्रतिक्रिया देताना प्रसारमाध्यमांना उद्दशून बच्चू कडू म्हणाले, समाजाला हुशार करण्याची जबाबदारी राजकीय नेत्यांची असते. पण राजकीय नेते चुकले तर तुम्ही(माध्यमांनी) त्यांना ताळ्यावर आणलं पाहिजे. जे काही सत्य आहे. ते तुम्ही मांडलं पाहिजे. यामुळे राजकीय नेते रुसले तर तुमचं काहीचं बरं-वाईट होत नाही. तुमच्यामागे ईडीची चौकशीही लागू शकत नाही. ईडी लागणार नाही, अशाप्रकारे काम करत रहा.

खरं बोलणाऱ्या लोकांमागे ईडी लावली जाते, असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न विचारला असता बच्चू कडू म्हणाले की, मी तर आता भाजपाबरोबर आहे. पण भाजपावाल्यांना माझा एक प्रश्न आहे. माझा सरळ प्रश्न आहे. ईडीने एकाही भाजपाच्या नेत्याची चौकशी का केली नाही? त्यांनी याचं उत्तर द्यायला हवं. एका सामान्य कार्यकर्त्यालाही हा प्रश्न पडतो. ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट किंवा काँग्रेसच्या नेत्यांची चौकशी केली जाते. पण भाजपच्या एकाही नेत्याची चौकशी होत नाही. शिंदे गटाच्या नेत्यांमागे ईडीची चौकशी सुरु होती. पण ते आता सत्तेत आले आहेत, असं उत्तर त्यांनी दिलं.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी