PTI
क्रीडा

रिंकूसह १० जणांना दुलीप ट्रॉफीसाठी संधी; बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पंत, गिल, कुलदीप सराव शिबिरात दाखल

Duleep Trophy Cricket Tournament: प्रति‌भावान डावखुरा फलंदाज रिंकू सिंगसह एकूण १० जणांना दुलीप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या पुढील सामन्यांत खेळण्याची संधी लाभणार आहे.

Swapnil S

बंगळुरू : प्रति‌भावान डावखुरा फलंदाज रिंकू सिंगसह एकूण १० जणांना दुलीप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या पुढील सामन्यांत खेळण्याची संधी लाभणार आहे. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून या मालिकेच्या तयारीसाठी ऋषभ पंत, के. एल. राहुल, शुभमन गिल, कुलदीप यादव असे तारांकित खेळाडू सराव शिबिरात दाखल झाले आहेत. त्यामुळे १२ सप्टेंबरपासून रंगणाऱ्या दुसऱ्या साखळी फेरीसाठी नव्या खेळाडूंना संधी लाभेल.

भारत-बांगलादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल. त्यातील पहिल्या कसोटीसाठी दोन दिवसांपूर्वीच भारताचा संघ जाहीर करण्यात आला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघात यष्टीरक्षक पंत, राहुल यांचे पुनरागमन झाले आहे. तसेच गिल, यशस्वी जैस्वाल, फिरकीपटू कुलदीप, आकाशदीप, अक्षर पटेल व ध्रुव जुरेल भारतीय संघाचा भाग आहेत. त्यामुळे ते दुलीप ट्रॉफीतील पुढील फेरी खेळू शकणार नाहीत. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल व सर्फराझ खान यांना मात्र पहिल्या कसोटीसाठी अंतिम ११ संघात स्थान मिळणे कठीण असल्याने ते दुलीप ट्रॉफीतच खेळतील.

अशा स्थितीत रिंकूचा भारत-ब संघात समावेश करण्यात आला आहे. भारत-ब संघात यशस्वी व पंतच्या जागी रिंकू व सुयश प्रभुदेसाई खेळतील. तसेच गिलच्या जागी मयांक अगरवाल भारत-अ संघाचे कर्णधारपद भूषवणार असून रेल्वेच्या प्रथम सिंगला या संघात दाखल करण्यात आले आहे. त्याशिवाय राहुलच्या जागी विदर्भागाच अक्षय वाडकर, तर जुरेलच्या जागी शेख रशीद भारत-अ संघाकडून खेळतील. कुलदीपच्या जागी मुंबईचा शम्स मुलाणी खेळणार असून उत्तर प्रदेशच्या अकिब खानला आकाशदीपच्या जागी स्थान लाभले आहे. भारत-क संघात एकही बदल करण्यात आलेला नाही. अक्षर पटेलच्या जागी भारत-ड संघात निशांत संधू दाखल झाला आहे.

अनुभवालाच भारतीय संघात प्राधान्य

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अनुभवी खेळाडूंनाच भारतीय संघात प्राधान्य दिले जाईल, असे संकेत निवड समितीच्या पदाधिकाऱ्याने दिले आहेत. राहुल व पंतच्या अनुपस्थितीत इंग्लंडविरुद्ध मार्चमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत ध्रुव जुरेल, सर्फराझ खान यांनी लक्ष वेधले. मात्र आता त्यांना संघातील स्थानासाठी संघर्ष करावा लागू शकतो. वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमरासह मोहम्मद सिराजची निवड होईल, असे दिसते.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी