क्रीडा

एकाच वेळी १८ दशलक्ष लोकांनी पाहिले लाइव्ह स्ट्रीमिंग

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सामन्याचा पहिला चेंडू टाकला, तेव्हा ३६ लाख लाइव्ह व्ह्यूज होते

वृत्तसंस्था

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या सुपर-१२ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सामना डिस्ने प्लस हॉटस्टारवर १८ दशलक्ष लोकांनी पाहिला. या सामन्याने प्रेक्षकसंख्येचा नवा विक्रम रचला.

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सामन्याचा पहिला चेंडू टाकला, तेव्हा ३६ लाख लाइव्ह व्ह्यूज होते. पाकिस्तानचा डाव संपला तेव्हा ११ दशलक्ष प्रेक्षक अॅपवर लाइव्ह होते. त्यानंतर डावाच्या विश्रांतीदरम्यान हा आकडा १४ दशलक्ष दर्शकांवर पोहोचला. भारताने जेव्हा धावांचा पाठलाग सुरू केला, तेव्हा एकूण ४ दशलक्ष दर्शकांनी सामना पाहण्यास सुरुवात केली. परंतु जेव्हा भारताने सामना जिंकला तेव्हा ही संख्या १८ दशलक्ष झाली.

हा सामना भारतातील स्टार स्पोर्ट्सवर प्रसारित झाला. स्टार स्पोर्ट्सवर हा सामना पाहणाऱ्या दर्शकांची संख्या एका आठवड्यानंतर टेलिव्हिजन प्रेक्षकमापन संस्था ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल (बार्क) द्वारे प्रसिद्ध केली जाणार असली, तरी परंतु डिजिटल प्लॅटफॉर्म हॉटस्टारचे आकडे जाहीर झाले आहेत.

डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर लाइव्ह स्ट्रीमिंग दरम्यान दोन्ही संघांमधील आशिया कप २०२२ सामन्यादरम्यान नोंदविलेल्या १४ दशलक्षांपेक्षा अधिक प्रेक्षक हे टी-२० विश्वचषक २०२२ च्या सामन्यापेक्षा अधिक असल्याचे एका सूत्राने पीटीआयला सांगितले. या वेळी १८ दशलक्ष प्रेक्षकांची संख्या एकाचवेळी लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान नोंदविली गेली. त्यामुळे मागील विक्रम मागे पडला.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री