क्रीडा

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभात नृत्य-गीताचे धमाकेदार सादरीकरण

वृत्तसंस्था

बर्मिंगहॅममधील २२व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभात सोमवारी रात्री अलेक्झांडर स्टेडियममध्ये नृत्य-गीताचे धमाकेदार सादरीकरण झाले. ब्रिटनचे प्रिन्स एडवर्ड यांनी २०व्या खेळांच्या समारोपाची घोषणा केली. यजमानांनी रंगतदार कार्यक्रमांचे सादरीकरण करून जगातील राष्ट्रकुल देशाचा निरोप घेतला; तर चॅम्पियन्सनी व्हिक्टोरियात भेटण्याच्या वचनासह बर्मिंगहॅमला अलविदा केले.

राष्ट्रकुल ध्वज खाली उतरवून तो सुरक्षा अधिकाऱ्यांनी टीम ऑस्ट्रेलियाकडे सुपूर्द केला. हा ध्वज व्हिक्टोरियाच्या गव्हर्नरला देण्यात आला. पुढील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियात होणार आहेत.

समारोप समारंभात सर्व खेळाडू फ्लॅग मार्चमध्ये सहभागी झाले. सोहळ्यादरम्यान अलेक्झांडर स्टेडियम रोषणाईने उजळून निघाले.

उद्घाटन सोहळ्याप्रमाणेच समारोपातही बर्मिंगहॅमच्या इतिहासाचे विविध पैलू उलगडून दाखविण्यात आले. कलाकारांच्या परफॉर्मन्सने चाहत्यांचा उत्साह वाढविला. मिडलँडमधील कलाकारांनी एकत्रितपणे सादरीकरण केले. सुपरस्टार गोल्डी, वुल्व्हरहॅम्प्टनमधील बेव्हरली नाइट इनर सिटी लाइफ यांनी एकत्र परफॉर्म केले. समारोप समारंभात कलाकारांनी दमदार परफॉर्मन्स दाखविला.

पंजाबी एमसीने ‘मुंडिया तू बचके रहियो...’ या गाण्यावर भांगडा सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. रॉकस्टार ओझी ऑस्बॉर्ननेही परफॉर्म केले. त्याच्याशिवाय गायिका जोरजा स्मिथने सादरीकरण केले. विशेष म्हणजे, ११ वर्षांची चिमुकली जोरजा स्मिथ गात असलेली गाणी स्वतःच लिहिते.

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

आज पनवेल, कल्याण, अंबरनाथ तापणार; ४४ अंश तापमानाचा अंदाज

५ लाख पर्यटकांचा प्रवास; ऐतिहासिक नेरळ-माथेरान टॉय ट्रेनला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मिळाला तब्बल 'इतक्या' कोटींचा महसूल

खासगीकरणाची 'बेस्ट' धाव ! बेस्टमध्ये आता ड्राफ्ट्समनही कंत्राटी; अंतर्गत कामासाठी कंत्राटी पद्धत