क्रीडा

IPL 2023 लाही कोरोनाचा विळखा; समालोचक आकाश चोप्रा कोविड पॉझिटीव्ह

भारतीय क्रिकेटमधील प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली

प्रतिनिधी

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. अशामध्ये नुकतेच सुरु झालेल्या आयपीएल २०२३लाही कोरोनाचा विळखा बसला आहे. नुकतेच प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता बीसीसीआयच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, आकाश चोप्राने स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे.

देशामध्ये पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढू लागले आहे. तर दुसरीकडे ३१ मार्चला आयपीएलच्या १६व्या हंगामाची जोरदार सुरुवात झाली. अशामध्ये प्रसिद्ध समालोचक आणि माजी किर्केटपटू आकाश चोप्राला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली. त्याने ट्विट केले की, "कोरोनाने पुन्हा एकदा माझ्यावर हल्ला केला. कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवली आहेत. काही दिवस मी समालोचन करताना दिसणार नाही. घसादेखील बसल्यामुळे आवजाची समस्या होऊ शकते." असे ट्विट त्याने केले आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन