क्रीडा

एबी डिव्हिलियर्स चक्क दोन वर्षांनी दिला कोहलीला रिप्लाय

कोहलीने दोन वर्षांपूर्वी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला होता.

वृत्तसंस्था

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट केलेल्या एका फोटोला दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स चक्क दोन वर्षांनी उत्तर दिले.

कोहलीने दोन वर्षांपूर्वी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये विराटसोबत डिव्हिलियर्स, मोहम्मद सिराज आणि देवदत्त पडिक्कल दिसत होते. विराट कोहलीने या फोटोला एक मजेशीर कॅप्शन दिले होते. “या फोटोमुळे मला पुन्हा शाळेतील दिवसांची आठवण झाली आहे. एकाच वर्गातील चार मुलांपैकी फक्त एबी असा मुलगा आहे ज्याने गृहपाठ पूर्ण केला आहे. इतर तीन जणांना माहित आहे की ते आता अडचणीत आले आहेत.” कोहलीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये फक्त डिव्हिलियर्सच्या चेहऱ्यावर हसू होते, तर विराटसह बाकीचे खेळाडू काहीसे उदास दिसत होते. या फोटोवर आता दोन वर्षांनी एबी डिव्हिलियर्सने मजेशीर प्रतिक्रिया दिली. डिव्हिलियर्सने लिहिले की, “...मी सिराजचा गृहपाठ केला आहे.” ही प्रतिक्रिया आता व्हायरल होत आहे.

एकमेकांचे खास मित्र असूनही मित्राच्या मेसेजला डिव्हिलियर्स वेळच्यावेळी रिप्लाय देत नसल्याचे निदर्शनास आले. डिव्हिलियर्सने केलेल्या या ट्वीटमुळेच ही बाब उघड झाली. पण कोहली आणि डिव्हिलियर्स एकमेकांचे खास मित्र आहेत, हे सर्वश्रुत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाकडून आयपीएल खेळत असताना दोघांमध्ये झालेली घट्ट मैत्री अद्याप टिकून आहे.

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Thane First Metro : ठाणे मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी यशस्वी; कशी आहे ठाणेकरांची पहिली मेट्रो, जाणून घ्या

मुंब्रा बायपासवर भीषण अपघात; कंटेनर ट्रकची दुचाकीला धडक, ३ तरुणांचा मृत्यू

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुप्रीम कोर्टाचा दणका; २०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा नाही

कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन्...; मुलुंड टोलनाक्याजवळ अपघात, ८ ते ९ वाहने एकमेकांना आदळली