PTI
क्रीडा

निवृत्ती मागे घेण्याचा विनेशला देशभरातून सल्ला

भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा. तिने पुन्हा एकदा कुस्तीकडे वळावे, असा नारा देशभरातून देण्यात येत आहे.

Swapnil S

पॅरिस : भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा. तिने पुन्हा एकदा कुस्तीकडे वळावे, असा नारा देशभरातून देण्यात येत आहे. यामध्ये आजी-माजी क्रीडापटू तसेच भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांचाही समावेश आहे.

२९ वर्षीय विनेशला बुधवारी महिलांच्या ५० किलो वजनी गटात सुवर्णपदकाच्या लढतीत सहभागी होण्यापासून रोखण्यात आले. लढतीपूर्वी सकाळी केलेल्या वजनादरम्यान विनेशचे वजन ५० किलोंपेक्षा १०० ग्रॅम अधिक भरल्याने विनेशला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर गुरुवारी विनेशने निवृत्तीची घोषणा केली. तसेच याविरोधात क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे.

अनेकदा पराभव न पचल्यावर खेळाडू असे निर्णय घेतात. मात्र विनेश तू पुन्हा या निर्णयाचा विचार कर. आपण भारतात आल्यावर याविषयी संवाद साधू. मला खात्री आहे तु पुन्हा कुस्तीकडे वळशील व देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकशील.
- महावीर सिंग फोगट, विनेशचे काका व गुरू
विनेशच्या निवृत्तीची बातमी धक्कादायक आहे. मी भारतीय महासंघाचा अध्यक्ष या नात्याने तिला निवृत्ती मागे घेण्याची विनंती करतो. तिच्याकडे अद्याप कुस्तीसाठी बरेच काही शिल्लक आहे.
- संजय सिंह, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष
तुझ्यासारखे खेळाडू दशकात एकदाच घडतात. तुझ्यासोबत जे झाले, ते क्लेशकारक आहे. शक्य झाल्यास तुझ्या निर्णयाविषयी विचार कर.
- अभिनव बिंद्रा, माजी नेमबाज
विनेश तू हरली नाहीस, तर तुला हरवण्यात आले आहे. हा भारताचा पराभव आहे. संपूर्ण देश तुझ्या सोबत आहे.
- साक्षी मलिका, माजी कुस्तीपटू
विनेशची निवृत्ती ही तमाम टीकाकारांना लगावलेली चपराक आहे. विनेश तुझ्यासारखी कुस्तीपटू देशाला पुन्हा मिळणार नाही.
- बजरंग पुनिया, भारताचा कुस्तीपटू

हॉटेल उद्योगावर मंदीचे सावट; शुल्क कमी न केल्यास ‘हॉटेल बंदचा’ व्यावसायिकांचा इशारा

IND vs ENG 2025 : क्रिकेटच्या पंढरीत भारताची कसोटी! लॉर्ड्स स्टेडियमवर आजपासून तिसरा सामना, मालिकेत आघाडी घेण्याचे लक्ष्य

मुंबई-गोवा महामार्गावरील नवीन सिमेंटचे रस्तेही खचले; शिवसेना ठाकरे गटाच्या पाहणी दौऱ्यात प्रशासनाची पोलखोल

सरकारी धोरणांविरोधात आंदोलनांची लाट; ठाणे-भिवंडी-पालघरमध्ये संघटनांचा एल्गार

भारतीय वंशाचे सबिह खान Apple चे नवे COO; लवकरच घेणार जेफ विल्यम्स यांची जागा