हिलीचा दीडशतकासह अलविदा ; ऑस्ट्रेलियाचा भारताला व्हाइटवॉश 
क्रीडा

हिलीचा दीडशतकासह अलविदा ; ऑस्ट्रेलियाचा भारताला व्हाइटवॉश; मूनीचेही शानदार शतक; ४०९ धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय महिला संघ २२४ धावांत गारद

कर्णधार एलिसी हिलीने रविवारी एकदिवसीय कारकीर्दीतील अखेरच्या लढतीत शानदार दीडशतक साकारताना ९८ चेंडूंत १५८ धावा फटकावल्या. तिला बेथ मूनीच्या (८४ चेंडूंत नाबाद १०६) शतकाची सुरेख साथ लाभली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात भारताचा १८५ धावांनी फडशा पाडून मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले.

Swapnil S

होबार्ट : कर्णधार एलिसी हिलीने रविवारी एकदिवसीय कारकीर्दीतील अखेरच्या लढतीत शानदार दीडशतक साकारताना ९८ चेंडूंत १५८ धावा फटकावल्या. तिला बेथ मूनीच्या (८४ चेंडूंत नाबाद १०६) शतकाची सुरेख साथ लाभली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात भारताचा १८५ धावांनी फडशा पाडून मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले.

भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून या दौऱ्यात उभय संघांत ३ टी-२०, ३ एकदिवसीय व १ कसोटी सामना खेळवण्यात येईल. त्यापैकी टी-२० मालिकेत भारताने २-१ अशी बाजी मारली. मग एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन्ही लढती जिंकून ऑस्ट्रेलियाने आधीच विजयी आघाडी घेतली होती. ३५ वर्षीय हिलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असल्याने तिसरा सामना तिचा एकदिवसीय प्रकारातील शेवटचा होता. आता ६ मार्चपासून पर्थ येथे होणारी कसोटी लढत खेळून हिली सर्वप्रकारच्या क्रिकेटला अलविदा करणार आहे.

उभय संघांतील या लढतीत प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत तब्बल ७ बाद ४०९ धावांचा डोंगर उभारला. हिलीने २७ चौकार व २ षटकारांसह एकदिवसीय कारकीर्दीतील आठवे शतक झळकावले. मुख्य म्हणजे हिलीच्या कारकीर्दीचा स्ट्राइक रेट १००हून अधिक आहे. निवृत्तीच्या वेळी १००हून अधिक स्ट्राइक रेट असलेली ती एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. दुसरीकडे डावखुऱ्या मुनीने १० चौकार व १ षटकारासह सहावे शतक साकारले. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी १४५ धावांची भागीदारी रचली. जॉर्जिया वॉल (६२), निकोला कॅरी (नाबाद ३४) यांनीही उत्तम योगदान दिले. स्नेह राणाने हिली व वॉलचा अडसर दूर केला, मात्र मूनीने अखेरपर्यंत नाबाद राहून ऑस्ट्रेलियाला ४०० धावांपलीकडे नेले.

लक्ष्याचा पाठलाग करताना मग भारतीय संघ ४५.१ षटकांत २२४ धावांत गारद झाला. कर्णधार हरमनप्रीत कौर (२५), स्मृती मानधना (०), हरलीन देओल (१४) यांनी यावेळेस निराशा केली. जेमिमा रॉड्रिग्ज (४२) व राणा (४४) यांनी कडवा प्रतिकार केला. मात्र लेगस्पिनर एलाना किंगने ३३ धावांत ४ बळी मिळवून भारताला रोखले. एकदिवसीय विश्वचषक विजयानंतर भारतीय महिला संघ प्रथमच एकदिवसीय मालिका खेळत होता. मात्र त्यांना व्हाइटवॉश पत्करावा लागला. आता भारतीय महिला संघ आफ्रिकाविरुद्ध खेळणार आहे. त्यापूर्वी पर्थ येथे होणाऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या विजयाची अपेक्षा आहे.

तलावात राहणाऱ्या 'त्या' मुलाचा व्हिडिओ व्हायरल; मदतीसाठी अनंत अंबानींची धाव, एअरलिफ्टद्वारे मुंबईत आणून केली उपचारांची व्यवस्था

नवी मुंबई : Reel साठी लोकलवर दगडफेक केल्याचा 'अभिनय'? VIDEO व्हायरल होताच तरुणावर कारवाई, माफी मागत म्हणाला...

Kolkata Hotel Fire: हॉटेलमध्ये आगीचा भडका! झोपेतच ९ जणांचा दुर्दैवी अंत, ६ जण जखमी; VIDEO

Dombivli : पादचारी पुलावरील फेरीवाल्यांवर कारवाई; गर्दुल्ले, भिकाऱ्यांना पालिकेने हटवले

Ulhasnagar : पहाटेच्या अंधारात ‘ड्रग्ज डील’चा पर्दाफाश; रामकृष्ण कॉलनीत लाखोंच्या एमडी ड्रग्जसह दोघांना अटक