क्रीडा

भारतीय संघात पुन्हा मोठा बदल दुखापतग्रस्त दीपक चहरऐवजी वॉशिंग्टन सुंदरचा समावेश

वॉशिंग्टन सुंदर मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी टीम इंडियाचा भाग असेल.

वृत्तसंस्था

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान घोट्याला दुखापत झाल्यामुळे वेगवान गोलंदाज दीपक चहरला मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमधून वगळण्यात आले आहे. चहरच्या जागी अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश करण्यात आला आहे. दीपक चहर टी-२० विश्वचषकाच्या भारतीय संघाचा देखील एक भाग आहे.

वॉशिंग्टन सुंदर मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी टीम इंडियाचा भाग असेल. वॉशिंग्टन सुंदरही गेल्या काही काळापासून दुखापतीशी झुंज देत होता. आयपीएल 2022 दरम्यान सुंदरला दुखापत झाली होती. यानंतर तो बरा झाल्यानंतर पुन्हा त्याला दुखापत झाली. दुखापतीमुळे तो ऑगस्टमधील झिम्बाब्वे दौऱ्यातूनही बाहेर पडला होता. मात्र आता पुन्हा त्याला संधी मिळाली आहे.

सुंदरने भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने भारतीय संघासाठी चार कसोटी सामन्यात २६५ धावा आणि सहा विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर चार एकदिवसीय आणि ३१ टी-२० सामनेही खेळले गेले आहेत. टी-२० सामन्यांमध्ये सुंदरने फलंदाजीत ४७ धावा आणि गोलंदाजीत २५ विकेट्स घेतल्या आहेत.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

गिलचा पुन्हा शतकी नजराणा; चौथ्या दिवसअखेर भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर