क्रीडा

कुस्तीगीर परिषदेत शरद पवार यांना आणखी एक धक्का;भाजपचे उमेदवार बिनविरोध अध्यक्ष होणार

नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता

वृत्तसंस्था

काही दिवसांपूर्वी शरद पवार हे अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आल्यानंतर आता निवडणुका होणार असून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) रामदास तडस यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा शरद पवार यांना आणखी एक धक्का असल्योचे मानले जात आहे. भारतीय कुस्ती संघटनेच्या नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तीन जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी दोन जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. काकासाहेब पवार आणि धवलसिंग मोहिते पाटील यांनी आपले अर्ज मागे घेतले असून रामदास तडस यांची बिनविरोध निवड होणार आहे. आता काकासाहेब पवार सचिव, तर वैभव लांडगे उपाध्यक्षपदी असतील.

रामदास तडस हे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. शिवाय, तडस हे स्वतः चार वेळा विदर्भ केसरी राहिले आहेत. शरद पवारांचं वर्चस्व राहिलेल्या कुस्तीगीर परिषदेवर ताबा मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.

आधी तडस राष्ट्रवादीत होते. वर्धा चंद्रपूर गडचिरोली विधानपरिषदेतून तडस दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. देवळी नगरपरिषदेचे ते अध्यक्ष होते; तर राष्ट्रवादीकडून त्यांना एसटी महामंडळाचे संचालकपदही मिळाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचीच व्यक्ती शरद पवारांची जागा घेणार असल्याची भावनाही व्यक्त होत आहे.

याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून कोणत्याही स्पर्धेचे आयोजन करण्यात येत नसल्यामुळे परिषद बरखास्त करण्यात आल्याचे भारतीय कुस्ती संघटनेचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी स्पष्ट केले होते.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत