Photo : X (@TheKhelIndia)
क्रीडा

World Wrestling Championships 2025 : अंतिम पंघालची सलग दुसऱ्यांदा कांस्य दंगल!

क्रोएशियातील झागरेब येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत अखेर अंतिम पंघालनेच भारतासाठी पदकांचे खाते उघडले. महिलांच्या ५३ किलो वजनी गटात अंतिमने कांस्यपदक मिळवण्याची किमया साधली. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी २१ वर्षीय अंतिमने जागतिक पदक जिंकले.

Swapnil Mishra

झागरेब : क्रोएशियातील झागरेब येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत अखेर अंतिम पंघालनेच भारतासाठी पदकांचे खाते उघडले. महिलांच्या ५३ किलो वजनी गटात अंतिमने कांस्यपदक मिळवण्याची किमया साधली. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी २१ वर्षीय अंतिमने जागतिक पदक जिंकले.

१३ ते २१ सप्टेंबर या कालावधीत जागतिक कुस्ती स्पर्धा खेळवण्यात येत असून यामध्ये भारताचे ३० कुस्तीपटू सहभागी झाले आहेत. महिला, पुरुष यांची फ्री-स्टाईल तसेच ग्रीको-रोमन अशा तिन्ही गटांत भारताचे प्रत्येकी १० कुस्तीपटू पदकासाठी दावेदारी पेश करतील. २०२३च्या जागतिक स्पर्धेत भारतीय कुस्ती महासंघावर बंदी असल्याने खेळाडूंना भारताच्या ध्वजाखाली खेळता आले नाही. तर २०२४मध्ये भारताने फक्त मानसी अहलावतच्या रुपात एकमेव कांस्यपदक जिंकले. आता २०२५मध्ये बजरंग पुनिया, विनेश फोगट, रवी दहिया यांसारख्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवांवर भारताची भिस्त आहे.

मात्र या स्पर्धेत आतापर्यंत भारताच्या सर्व खेळाडूंनी निराशा केली होती. पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता अमन सेहरावत ५७ किलो गटात वजन वाढल्याने स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच बाहेर गेला. लढतीच्या दिवशी १.७ किलो वजन त्याचे अधिक भरलेले आढलले. यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये भारताच्या विनेश फोगटवर अशी वेळ ओढवली होती. विनेशचे सुवर्णपदकाच्या लढतीच्या दिवशी १०० ग्रम वजन अधिक भरले होते. त्यानंतर दीपक पुनिया, वैष्णवी पाटील, प्रिया मलिक यांनाही छाप पाडता आली नाही. स्पर्धेच्या पहिल्या तीन दिवसांत फक्त अंतिमच्या रुपात एकमेव भारतीय कुस्तीपटूने किमान उपांत्यपूर्व फेरीपर्यंत आगेकूच केली होती.

चांगल्या बचावासह निर्णायक क्षणी तिने आक्रमक खेळ केला. अंतिमने २३ वर्षांखालील जागतिक विजेती एमा डेनिसला ९-१ अशी धूळ चारली. २०२३मध्ये अंतिमने कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर आता सलग दुसऱ्या जागतिक पदकामुळे २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडे आशास्थान म्हणून पाहिले जात आहे. विनेश फोगट याच वजनी गटात सहभागी व्हायची. आता अंतिमने तिची जागा घेतली आहे. अंतिमने २०२२मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतही कांस्य पटकावले होते. त्यामुळे भविष्यात ती आणखी भरारी घेईल, अशी अपेक्षा आहे.

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Thane First Metro : ठाणे मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी यशस्वी; कशी आहे ठाणेकरांची पहिली मेट्रो, जाणून घ्या

मुंब्रा बायपासवर भीषण अपघात; कंटेनर ट्रकची दुचाकीला धडक, ३ तरुणांचा मृत्यू

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुप्रीम कोर्टाचा दणका; २०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा नाही

कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन्...; मुलुंड टोलनाक्याजवळ अपघात, ८ ते ९ वाहने एकमेकांना आदळली