तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा : भारताच्या प्रीथिका प्रदीपला कांस्यपदक  (Photo-X)
क्रीडा

तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा : भारताच्या प्रीथिका प्रदीपला कांस्यपदक

भारताची १७ वर्षीय तिरंदाज प्रीथिका प्रदीप हिने चमकदार कामगिरी करत शनिवारी माद्रिदमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक टप्पा ४ स्पर्धेत वैयक्तिक कांस्यपदक पटकावले.

Swapnil S

माद्रिद: भारताची १७ वर्षीय तिरंदाज प्रीथिका प्रदीप हिने चमकदार कामगिरी करत शनिवारी माद्रिदमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक टप्पा ४ स्पर्धेत वैयक्तिक कांस्यपदक पटकावले. या यशासह तिने या स्पर्धेत दुहेरी पदक मिळवण्याचा पराक्रम पूर्ण केला.

प्रीथिकाने जागतिक क्रमवारीत ११ व्या क्रमांकावर असलेल्या तुर्कीच्या हझल बुरूनचा १४५-१४२ अशा फरकाने पराभव केला. पहिल्या फेरीत पिछाडीवर पडल्यानंतरही प्रीथिकाने अप्रतिम पुनरागमन केले आणि शेवटच्या वेधवर अचूक १० गुण मिळवून आपल्या पहिल्या वैयक्तिक विश्वचषक पदकावर नाव कोरले. माद्रिद विश्वचषकापूर्वीच भारतीय संघात रूजू झालेले अमेरिकेचे प्रसिद्ध कम्पाऊंड प्रशिक्षक डेव्ह कझिन्स यांच्या मार्गदर्शनाखाली भारताची ही एक प्रभावी सुरुवात ठरली आहे.

यापूर्वी झालेल्या महिला कम्पाऊंड सांघिक प्रकाराच्या अंतिम सामन्यात प्रीथिकाने भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी केली होती. तिने सामन्यात दोन परफेक्ट फेऱ्यांसह सहा वेळा १० गुणांवर अचूक वेध घेतला. मात्र, अनुभवी ज्योती सुरेखा वेन्नम आणि चिकीथा तानीपार्थी यांना लय सापडत नसल्याने भारताला अंतिम फेरीत कोलंबियाकडून २२८-२३२ असा पराभव पत्करावा लागला आणि रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

आज दोन पदकांची अपेक्षा

भारताने कम्पाऊंड प्रकारातील आपली मोहीम दोन पदकांसह संपवली असून रविवारी रिकर्व्ह प्रकारात आणखी दोन पदके मिळवण्याची आशा आहे. गत महिन्यात अंताल्या येथे विश्वचषकात पदार्पण करणारी भारताची आणखी एक युवा तिरंदाज कीर्ती शर्मा दुहेरी पदकाच्या शर्यतीत आहे. ती भारताचा अव्वल क्रमांकाचा तिरंदाज धीरज बोम्मदेवरा याच्यासोबत रिकर्व्हे मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदकाच्या लढतीसाठी मैदानात उतरेल.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nandurbar : शासकीय वसतिगृहात अन्नातून विषबाधा? ४० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली; अन्नाचे नमुने तपासणीसाठी

Mumbai : उघड्या मॅनहोलसाठी स्वतंत्र चॅटबॉट; लोकेशन अन् फोटो पाठवून करता येणार तक्रार

Mumbai : सरकारी डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करतोच असे गृहित धरता येणार नाही; अपघात भरपाई प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय

नौदलाच्या ताफ्यात 'आयएनएस महेंद्रगिरी' दाखल; सागरी सुरक्षा अधिक भक्कम - ‘माझगाव डॉक’ने बनवली अत्याधुनिक युद्धनौका

एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी? उत्तर महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण