Asian Games 2026 Boxing : अंकुश, परवीनची अंतिम फेरीत धडक; नरेंदरला कांस्य (Photo-X)
क्रीडा

Asian Games 2026 Boxing : अंकुश, परवीनची अंतिम फेरीत धडक; नरेंदरला कांस्य

भारताचा बॉक्सर अंकुश पांघलने आशियाई क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारत गेल्या आठ वर्षांतील पुरुषांच्या बॉक्सिंगमधील प्रतिक्षा संपवली आहे.

Swapnil S

निशियो : भारताचा बॉक्सर अंकुश पांघलने आशियाई क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारत गेल्या आठ वर्षांतील पुरुषांच्या बॉक्सिंगमधील प्रतिक्षा संपवली आहे. या स्पर्धेत परवीन हूडा हिने महिलांच्या ६५ किलो वजनी गटाच्या सुवर्णपदक सामन्यात दिमाखात प्रवेश केला, तर नरेंद्र बेरवालला ९० पेक्षा अधिक किलो वजन गटाच्या उपांत्य फेरीत पराभवास सामोरे जावे लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

परवीनने चीनच्या लि शु हिचा ५-० असा पराभव केला, तर अंकुश पांघलने ७५ किलो वजनी गटाचा जागतिक विजेता उझबेकिस्तानचा फजलदिन एरकिनबोएव याचा ४-१ असा पराभव करत ८० किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे, नरेंदरला कझाकस्तानच्या जागतिक सुपर हेवीवेट विजेता ऐबेक ओरलबायविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ०-५ असा पराभव पत्करावा लागला. हांगाझो येथे २०२३ मध्ये पदक पटकावल्यानंतर नरेंदरचे आशियाई स्पर्धेतील हे दुसरे कास्य पदक ठरले आहे. २०१८ मध्ये ४९ किलो वजनी गटाचे सुवर्ण जिंकणाऱ्या अमित पांघलनंतर अंतिम फेरीत पोहोचणारा अंकुश पहिला भारतीय पुरुष बॉक्सर ठरला आहे. सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर अंकुशने दमदार पुनरागमन करत विजय मिळवला.

परवीन आशियाई स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी केवळ तिसरी भारतीय महिला बॉक्सर ठरली आहे. तिने याआधी मेरीकॉम आणि लव्हलिना बोर्गोहैन यांनी मिळवलेल्या यशामध्ये आपले नाव जोडले आहे. परवीनची अंतिम फेरीत तिची गाठ चायनीज ताइपेच्या ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती चेन निेन-चिन हिच्याशी पडेल.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : ५ ऑक्टोबरपासून बेस्ट मार्गांत बदल; आठ मार्गांचे वातानुकूलित सेवेत रूपांतर

Mumbai : ...तर पैसे परत घेण्याचा अधिकार; उच्च न्यायालयाचा ग्राहकाला दिलासा, बिल्डरांना झटका

Mumbai : अनुकंपा नियुक्ती हा नोकरी अधिकार नाही; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

विद्यार्थ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार; देशभरातील सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर

Jalgaon : शेतातील पांढरे सोने काळवंडणार; कापूस उत्पादन ५० ते ६० टक्के घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज