नागोया : भारताचा तिरंदाज गणेश मणीरत्नम थिरुमुरुने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे. बुधवारी सुवर्णपदक जिंकणाऱ्या पुरुष संघाचा भाग असलेल्या २० वर्षीय गणेशने कांस्य पदकाच्या सामन्यात व्हिएतनामच्या काँग डुक डंगचा १४९-१४४ असा पराभव केला. या सामन्यात त्याने शानदार प्रदर्शन करताना १५ पैकी १४ शॉट्स अचूक टार्गेटवर साधले.
यापूर्वी उपांत्य फेरीत गणेशला दक्षिण कोरियाच्या किम जोंगहोविरुद्ध १४४-१४८ असा पराभव पत्करावा लागला होता. उपांत्यपूर्व फेरीतील दमदार फॉर्म कायम राखण्यात अपयशी ठरल्यामुळे तो पिछाडीवर राहिला आणि अखेर त्याने २९-३०, २९-३०, २९-२८, २९-३० आणि २८-३० असा पराभव पत्करला.