Asian Games 2026 Athletics : गुलवीरला कांस्य; पदकांची हॅटट्रिक पूर्ण (Photo-X)
क्रीडा

Asian Games 2026 Athletics : गुलवीरला कांस्य; पदकांची हॅटट्रिक पूर्ण

भारताच्या गुलवीर सिंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपली उत्कृष्ट कामगिरी कायम राखत मंगळवारी पुरुषांच्या ५००० मीटर शर्यतीत १३:३२.७५ मिनिटांची वेळ नोंदवून कांस्यपदक जिंकले आणि या स्पर्धेत पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली.

Swapnil S

नागोया : भारताच्या गुलवीर सिंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपली उत्कृष्ट कामगिरी कायम राखत मंगळवारी पुरुषांच्या ५००० मीटर शर्यतीत १३:३२.७५ मिनिटांची वेळ नोंदवून कांस्यपदक जिंकले आणि या स्पर्धेत पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली.

या स्पर्धेतील गुलवीरचे हे तिसरे पदक आहे. याआधी त्याने पुरुषांच्या १५०० मीटर आणि १०००० मीटर शर्यतींमध्ये रौप्यपदके जिंकली होती. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत ट्रॅक अँड फील्ड प्रकारांत तीन पदके जिंकणारा गुलवीर हा दुसरा भारतीय पुरुष ठरला आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत भारताच्या लावी पिंटो यांनी १०० मीटर आणि २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक, तसेच ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. १९८६ च्या सोल आशियाई क्रीडा स्पर्धेत पी. ​​टी. उषा यांनी जिंकलेली चार सुवर्णपदके आणि एका रौप्यपदकाची कामगिरी आजही अबाधित असली, तरी मध्यम अंतरावरील धावपटू के. एम. बीनामोल यांनी २००२ च्या बुसान स्पर्धेत तीन पदके जिंकली होती.

मिश्र आणि पुरुषांच्या रिले शर्यतीत कांस्य

गुरिंदरवीर सिंग, अमीनश कुजुर, स्नेहा सत्यनारायण आणि हरिता भद्रा यांनी ४ बाय १०० मीटर मिश्र रिले अंतिम फेरीत ४१.०६ सेकंद असा हंगामातील सर्वोत्तम वेळ नोंदवत कांस्यपदक पटकावले. तसेच भारतीय पुरुषांनीही ४ बाय ४०० मीटर शर्यतीत कांस्य जिंकले. महिलांच्या उंच उडी प्रकारात पूजा सिंग हिने १.८४ मीटर झेप घेत कांस्यपदक आपल्या नावावर केले. १९ वर्षीय पूजा बऱ्याच वेळापर्यंत गटात आघाडीवर होती, मात्र खराब कामगिरीमुळे तिचे सुवर्ण हुकले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : ५ ऑक्टोबरपासून बेस्ट मार्गांत बदल; आठ मार्गांचे वातानुकूलित सेवेत रूपांतर

Mumbai : ...तर पैसे परत घेण्याचा अधिकार; उच्च न्यायालयाचा ग्राहकाला दिलासा, बिल्डरांना झटका

Mumbai : अनुकंपा नियुक्ती हा नोकरी अधिकार नाही; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

विद्यार्थ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार; देशभरातील सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर

Jalgaon : शेतातील पांढरे सोने काळवंडणार; कापूस उत्पादन ५० ते ६० टक्के घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज