भारताची सुवर्णपदकासाठी आज श्रीलंकेशी लढत X| @BCCIWomen
क्रीडा

IND W Vs SL W Asian Games Final: भारताची सुवर्णपदकासाठी आज श्रीलंकेशी लढत

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा सुवर्णपदकाच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे. मंगळवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारता सामना श्रीलंका संघाशी होईल.

Swapnil S

निशिन : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा सुवर्णपदकाच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे. मंगळवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारता सामना श्रीलंका संघाशी होईल.

आशियाई खंडातील आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल, तर दुसरीकडे श्रीलंका संघ भारताला तगडे आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने जपान आणि बांगलादेशवर एकतर्फी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

चालू महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने श्रीलंकेचा पराभव केला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी विजय मिळवून आशियाई खेळातील सुवर्णपदक पटकावण्याचा भारतीय संघाचा मानस आहे. भूतकाळात श्रीलंकेने भारताला पराभूत केले असले, तरी अलीकडच्या काळात दोन्ही संघांमधील फरक खूप वाढला आहे. श्रीलंकेच्या संघाने उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार चामरी अटापट्टूच्या ५० चेंडूंत ८२ धावांच्या जोरावर विजय मिळवला होता.

भारतीय संघाची सलामीची फलंदाज शफाली वर्मा सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, मात्र संघ व्यवस्थापन अजूनही तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाजाबाबत प्रयोग करत आहे. बांगलादेशविरुद्ध जी. कमालिनी तर जपानविरुद्ध भारती फुलमाळीला तिसऱ्या क्रमांकावर संधी देण्यात आली होती. कर्णधार हरमनप्रीत कौर आशिया चषकात आपल्या लयमध्ये नव्हती, त्यामुळे या महत्त्वाच्या अंतिम सामन्यात ती मोठी खेळी करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दुष्काळाचा ३ टप्प्यांत आढावा; राज्य सरकारकडून मदत; उपाययोजनांना सुरुवात, ५ ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार

हेक्टरी १ लाख मदत, पूर्ण कर्जमाफी द्या : हर्षवर्धन सपकाळ

पुण्यात दोन CA विरोधात गुन्हा; 'शेल'च्या माध्यमातून ४,४२७ कोटींची करचुकवेगिरी

प्राध्यापकावर कारवाई; IIT मुंबईतील विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी संस्थेने मागितली माफी; गेल्या २० वर्षांत १६० विद्यार्थ्यांची आत्महत्या

ठाण्याला पावसाने झोडपले; राज्यातील अनेक भागांना यलो अलर्ट