क्रीडा

वेस्ट इंडिजचा २७ धावांत खुर्दा; स्टार्कचे ६ बळी, ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय

डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने कारकीर्दीतील १००व्या कसोटीत अवघ्या ९ धावांत ६ बळी घेण्याचा पराक्रम केला. त्याला स्कॉट बोलंडने हॅटट्रिक घेत सुरेख साथ दिली.

Swapnil S

किंग्स्टन : डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने कारकीर्दीतील १००व्या कसोटीत अवघ्या ९ धावांत ६ बळी घेण्याचा पराक्रम केला. त्याला स्कॉट बोलंडने हॅटट्रिक घेत सुरेख साथ दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा दुसरा डाव अवघ्या २७ धावांत गुंडाळून तिसऱ्या कसोटीत १७६ धावांनी दणदणीत विजय नोंदवला.

या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २०४ धावांचा पाठलाग करताना विंडीजचा संघ तिसऱ्याच दिवशी १४.३ षटकांत २७ धावांत गारद झाला. कसोटी क्रिकेटमधील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात निचांकी धावसंख्या ठरली. यापूर्वी १९५५मध्ये न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध २६ धावांत गारद झाला होता.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २२५ धावा केल्या. त्यानंतर विंडीजचा संघ १४३ धावांत गारद झाला. मग दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघही १२१ धावांत ढेपाळला. अल्झारी जोसेफने ५, तर शेमार जोसेफने ४ बळी मिळवले. त्यामुळे विंडीजपुढे विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य उभे ठाकले.

मात्र स्टार्कने कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. त्याने मिकेल लुइस (४), केव्हिन अँडरसन (०), ब्रँडन किंग (०), शाय होप (२), जॉन कॅम्पबेल (०) व जेडन सील्स (०) यांचे बळी मिळवले. तर दुसरीकडे बोलंडने १४व्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर अनुक्रमे जस्टिन ग्रीव्हस (११), शेमार (०) व जोमेल (०) यांचे बळी मिळवले. स्टार्कलाच सामनावीर व मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल