क्रीडा

ऑस्ट्रेलियाचे मालिकेत निर्भेळ यश; तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर २७ धावांनी मात

Swapnil S

ऑकलंड : मॅथ्यू शॉर्टने (११ चेंडूतं २७ धावा आणि १ बळी) दिलेल्या अष्टपैलू योगदानाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडला डक‌वर्थ-लुईस नियमाच्या आधारे २७ धावांनी नमवले. याबरोबरच ऑस्ट्रेलियाने मालिकेत ३-० असे यश संपादन केले.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने १०.४ षटकांत ४ बाद ११८ धावा केलेल्या असताना पावसाचे आगमन झाले. ट्रेव्हिस हेडने ३३, तर ग्लेन मॅक्सवेलने २० धावा केल्या. किवींसाठी मिचेल सँटनर, ॲडम मिल्ने, बेन सीर्स यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. विजयासाठी न्यूझीलंडपुढे १० षटकांत १२६ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.

मात्र त्यांना १० षटकांत ३ बाद ९८ धावांपर्यंतच मजल मारता आली. ग्लेन फिलिप्स (नाबाद ४०) व मार्क चॅपमन (नाबाद १७) यांनी चौथ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी रचली, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. कांगारूंसाठी शॉर्ट, ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. शॉर्ट सामनावीर, तर तीन सामन्यांत ९८ धावा करण्यासह २ बळी मिळवणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. आता २९ फेब्रुवारीपासून उभय संघांत दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस