लाहोर : मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणारी आगामी टी-२० मालिका आणि पुढच्या महिन्यात होणाऱ्या श्रीलंका व झिम्बाब्वेसोबतच्या तिरंगी मालिकेसाठी माजी कर्णधार बाबर आझम आणि वेगवान गोलंदाज नसीम शहा यांचे पाकिस्तानच्या संघात पुनरागमन झाले आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यापासून बाबर संघाबाहेर आहे. मात्र आता बाबरसह फलंदाज अब्दुल समद आणि नसीम यांचे संघात पुनरागमन झाले आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत रावळपिंडी आणि लाहोर येथे होणार आहे. श्रीलंका, झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील तिरंगी मालिका १७ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान याच मैदानांवर खेळवली जाणार आहे.
आशिया कप स्पर्धेत अंतिम सामन्यासह भारतासोबत ३ वेळा पराभूत झाल्यामुळे पाकिस्तानच्या निवड समितीने टी-२० संघात बाबर आझमला संधी दिल्याचे बोलले जात आहे.