हसनचा भेदक मारा; ऑस्ट्रेलिया सर्व बाद १९८, बांगलादेशचा ऑस्ट्रेलिया दौरा (Photo-X)
क्रीडा

हसनचा भेदक मारा; ऑस्ट्रेलिया सर्व बाद १९८, बांगलादेशचा ऑस्ट्रेलिया दौरा

हसन मेहमूदसह (५५ धावांत ६ बळी) बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे कांगारूंची फलंदाजी ढेपाळली.

Swapnil S

डार्विन : हसन मेहमूदसह (५५ धावांत ६ बळी) बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे कांगारूंची फलंदाजी ढेपाळली. त्यामुळे बांगलादेशने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ५३ षटकांत १९८ धावांत गुंडाळला.

त्यानंतर बांगलादेशच्या फलंदाजांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा १ बाद ९६ धावांपर्यंत मजल मारली असून ते फक्त १०२ धावांनी पिछाडीवर आहेत. तांझिद हसन ३२, तर मोमिनूल हक ३५ धावांवर नाबाद आहे. शदमन इस्लाम २० धावांवर माघारी परतला. मात्र पहिला दिवस गाजवला तो कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करणारा २६ वर्षीय वेगवान गोलंदाज हसन यानेच.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ४५ धावांची बिनबाद सुरुवात केली होती. मात्र हसनने आपल्या सलग दोन षटकांत जॅक वेदराल्ड (२३) आणि ट्रेव्हिड हेड (२२) या दोन्ही सलामीविरांना बाद करून ऑस्ट्रेलियाला धक्के दिले.

त्यानंतर तस्कीन अहमद (२-५५) आणि इबादत हुसेन (२-३९) यांनी हसनला सुरेख साथ देत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडले. ऑस्ट्रेलियाकडून केवळ स्टीव्ह स्मिथ लढाऊ खेळ करत ७१ धावांची खेळी केली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता