जाणूनबुजून नो-बॉल टाकल्यास गोलंदाज निलंबित; बीसीसीआयचा नियम 
क्रीडा

जाणूनबुजून नो-बॉल टाकल्यास गोलंदाज निलंबित; बीसीसीआयचा नियम

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०२६-२७ च्या देशांतर्गत हंगामापूर्वी खेळण्याच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या नव्या नियमांनुसार मुद्दाम नो-बॉल किंवा नॉन-लँडिंग चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाला उर्वरित संपूर्ण सामन्यासाठी निलंबित केले जाईल.

Swapnil S

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०२६-२७ च्या देशांतर्गत हंगामापूर्वी खेळण्याच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या नव्या नियमांनुसार मुद्दाम नो-बॉल किंवा नॉन-लँडिंग चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाला उर्वरित संपूर्ण सामन्यासाठी निलंबित केले जाईल. सध्याच्या नियमांनुसार, अशा चेंडूंसाठी गोलंदाजाला केवळ त्या विशिष्ट डावापुरते निलंबित केले जात असे.

मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) नुकतेच सुचवलेले हे बदल बीसीसीआयने सर्व राज्य संघटनांना पाठवले आहेत. जाणुनबुजून फ्रंट फूट नो-बॉल टाकल्यास गोलंदाज संपूर्ण सामन्यात गोलंदाजी करू शकणार नाही, मात्र या बदलाबाबतचा निर्णय मैदानावरील पंच घेतील, असे बीसीसीआयने परिपत्रकात म्हटले आहे. याशिवाय, दिवसाच्या खेळाची समाप्ती, डावाची घोषणा, प्रशिक्षकांचा मैदानातील प्रवेश आणि यष्टीरक्षकाचे हातमोजे यासंबंधीचे नियमही बदलण्यात आले आहेत. आगामी देशांतर्गत हंगामाला पुढील महिन्यात दुलीप करंडक स्पर्धेने सुरुवात होत असून, त्यापूर्वी राज्य संघटनांनी पंच आणि सामनाधिकाऱ्यांना नव्या नियमांची माहिती देण्यास सुरुवात केली आहे.

अधिकाऱ्यांसाठी काही जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातील आणि परिपत्रकाचे संबंधित भाग त्यांना उपलब्ध करून दिले जातील, असे एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. देशांतर्गत हंगाम सुरू होण्यासाठी जवळपास महिनाभराचा कालावधी असल्याने हे सर्व करण्यासाठी पुरेसा वेळ असल्याचेही त्यांनी नमूद केले.

एकूणच आता बीसीसीआयच्या नव्या नियमांमुळे खेळाडूंचा कस लागणार आहे. त्यांना कोणतीही लबाडी करता येणार नाही. २०२६-२७च्या देशांतर्गत हंगामात कोणते आणखी खेळाडू चमकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. जम्मू आणि काश्मीरने २०२५-२६च्या रणजी हंगामाचे ऐतिहासिक जेतेपद काबिज केले होते. आता पुढील हंगामात त्यांना मुंबई, तमिळनाडू, कर्नाटक, विदर्भ यांच्याकडून कडवी झुंज मिळू शकते. त्यामुळे नव्या नियमांसह देशांतर्गत स्पर्धा रंगतदार होईल.

  • मुद्दाम नो-बॉल टाकल्यास गोलंदाज उर्वरित संपूर्ण सामन्यासाठी निलंबित होणार.

  • दिवसाच्या शेवटच्या षटकात गडी बाद झाला तरी ते षटक पूर्ण करावे.

  • देशांतर्गत एकदिवसीय सामन्यांमध्ये ड्रिंक्स ब्रेकदरम्यान मुख्य प्रशिक्षकांना मैदानात जाण्याची परवानगी.

  • यष्टीरक्षकाचे हातमोजे केवळ चेंडू टाकतानाच यष्टीच्या मागे असणे आवश्यक.

  • जर एखाद्या खेळाडूने जाणूनबुजून कमी धावा केल्या, तर क्षेत्ररक्षण करणारा कर्णधार पुढील चेंडू कोणता फलंदाज खेळेल हे ठरवू शकेल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कर्जमाफीची अंतिम यादी लवकरच; प्राप्तिकर भरणाऱ्यांची माहिती मिळाल्यानंतरच यादी प्रसिद्ध होणार, पहिल्या टप्प्यात २५ लाख शेतकऱ्यांची नावे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शाही खानपान; खानपानावर प्रत्येक वर्षी ९ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च

Navi Mumbai : कर्तव्य संपले... पण माणुसकी नाही; रबाळे वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने बेशुद्ध कारचालकाला जीवदान

ठाण्यातील अग्निसुरक्षा धाब्यावर; शहरातील आकडेवारीने प्रशासनाची झोप उडाली

Sindhudurg : बांदावासीयांचा विरोध; शक्तिपीठ द्रूतगती महामार्गासाठी जमीन संपादनाविरोधात हरकती दाखल