क्रीडा

IPL 2023 : आयपीएल सामन्यावर बेटींग; आठजणांना अटक

पोलीस कोठडीनंतर या सर्वांना अंधेरीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

नवशक्ती Web Desk

आयपीएल सामन्यावर बेटींग घेणाऱ्या आठजणांना ओशिवरा पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. तुषार संतोष सावडिया, रविंद्रसिंग जगनारायणसिंग राठोड, निरज संजय सावडिया, विक्रम धनश्याम कच्छवा, रोहित जगदीश गेहलोत, फरहान मलिक अन्वर अहमद आणि विक्रमसिंग खेमसिंग चौहाण अशी या आठजणांची नावे आहेत. पोलीस कोठडीनंतर या सर्वांना अंधेरीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आयपीएल सामन्यावर अंधेरीतील एका पॉश निवासी इमारतीमधून काही बुकी ऑनलाईन बेटींग घेत असल्याची माहिती खार पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने अंधेरीतील लोखंडवाला, यमुनानगरच्या ग्रीन क्रस्ट अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक ५०४ मध्ये छापा टाकला होता. यावेळी तिथे आठजण सनराईज हैद्राबाद आणि लखनौ सुपर जॉईट्स या सामन्यावर ऑनलाईन बेटींग घेताना दिसून आले.

आजचे राशिभविष्य, १८ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

सरकारी संवेदनशीलतेचाच दुष्काळ!

उपोषण मागे! सरकारशी चर्चेनंतर मनोज जरांगेंचा निर्णय; दिली तीन महिन्यांची अंतिम मुदत

डीजीपींच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास केवळ ‘सौम्य शिक्षा’?; मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

महिलांची आज जपानशी सलामी! आशिया चषक विजेता भारतीय संघ आता आशियाई स्पर्धेच्या मोहिमेवर