क्रीडा

'नौकानयनपटू' विष्णू ऑलिम्पिकसाठी पात्र

Swapnil S

ॲडलेड : भारताचा नौकानयनपटू विष्णू सरवानन पॅरिस ऑलिम्पिक २०२४साठी पात्र ठरला आहे. सलग दोन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला तो भारताचा पहिला नौकानयनपटू ठरला आहे.

ॲडलेड येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद नौकानयन स्पर्धेत २४ वर्षीय विष्णूने १५२ जणांमधून २६वा क्रमांक मिळवला. त्याने आयएलसीए-७ प्रकारात १७४ गुण कमावले. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय नौकानयनपटू ठरण्याचा मान त्याने मिळवला. मुंबईतील आर्मी याचिंगमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विष्णूने २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर २०२३मध्ये त्याने आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. हवा जोरात वाहत असताना तसेच थंडी असतानाही विष्णूने संयम ढासळू न देता ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. नौकानयनच्या या प्रकारात खेळाडूंना वाऱ्याची दिशा ओळखून नाव योग्यपणे चाल‌वण्याच्या कौशल्यावर गुण देण्यात येतात.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

मोदींच्या बुलडोझरच्या वक्तव्याला इंडिया आघाडीचा आक्षेप; निवडणूक आयोगाने मोदींवर कारवाई करावी - खर्गे