क्रीडा

बोपण्णा-एब्डन तिसऱ्या फेरीत; भारताच्या बालाजी-व्हिक्टर यांची घोडदाैड

भारताचा एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा रोमानियन सहकारी व्हिक्टर कॉर्नेआ यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

Swapnil S

मेलबर्न : भारताचा अनुभवी रोहन बोपण्णा व त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी मॅथ्यू एब्डन यांनी शुक्रवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीची तिसरी फेरी गाठली. त्याशिवाय भारताचा एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा रोमानियन सहकारी व्हिक्टर कॉर्नेआ यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

पुरुष दुहेरीत कोर्ट क्रमांक ३वर झालेल्या लढतीत ४३ वर्षीय बोपण्णा व एब्डन यांच्या दुसऱ्या मानांकित जोडीने जॉन मिलमन व एडवर्ड विंटर यांना ६-२, ६-४ अशी धूळ चारली. बालाजी-व्हिक्टर यांनी मॅटेओ अर्नाल्डी व आंद्रे पेलिग्रिनो या इटलीच्या जोडीवर ६-३, ६-४ असा सहज दोन सेटमध्ये विजय मिळवला. बालाजी व बोपण्णाच्या रुपात दोनच भारतीय खेळाडू या स्पर्धेत टिकून आहेत. पुरुष एकेरीत गुरुवारी सुमित नागलला दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, बोपण्णा मिश्र दुहेरीतही खेळणार आहे.

जोकोव्हिच, त्सित्सिपास चौथ्या फेरीत

सर्बियाचा अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच आणि ग्रीसचा सातवा मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास यांनी चौथ्या फेरीत कूच केली. जोकोव्हिचने थॉमस एचिव्हेरीला ६-३, ६-३, ७-६ (७-२) असे तीन सेटमध्ये नमवले. त्सित्सिपासने लुका वॅनवर ६-४, ६-०, ६-४ असे वर्चस्व गाजवले. महिलांमध्ये कोको गॉफने एलिसा पार्क्सला ६-०, ६-२ असे नेस्तनाबूत केले. दुसऱ्या मानांकित आर्यना सबालेंकाने लेसिया सुरेंकोचा ६-०, ६-० असा फडशा पाडला.

BMC Election: मुंबई महानगरपालिकेतील विजयी उमेदवारांची यादी; एका क्लिकवर वाचा सर्व माहिती

BMC Election : मुंबईच्या चाव्या महायुतीकडे; महापालिका निसटली, उद्धव ठाकरेंनी दिली कडवी झुंज

Maharashtra Local Body Election Results : राज्यात भाजपच ‘मोठा’ भाऊ; २९ पैकी २३ महापालिकांवर महायुतीचा कब्जा

BMC Election : मुंबईचे महापौरपद भाजपकडे तर शिंदेंचा उपमहापौर? २८ जानेवारीला महापौरपदाची निवडणूक

Thane : स्वबळाचा नारा काँग्रेसच्या अंगलट; ६० उमेदवारांना ‘भोपळा’ही फोडता आला नाही