क्रीडा

बुमरा टी-२० विश्वचषक गाजवेल -फिलँडर

Swapnil S

जोहान्सबर्ग : भारताचा जसप्रीत बुमरा जून महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात सर्वोत्तम गोलंदाज ठरेल, असे भाकीत आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज वर्नन फिलँडरने व्यक्त केले. बुमराने बुधवारी कसोटी क्रमवारीत अग्रस्थान मिळवतानाच तिन्ही प्रकारांत पहिला क्रमांक पटकावणारा पहिला गोलंदाज ठरण्याचा मान मिळवला. “बुमरा हा विश्वातील परिपूर्ण गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्याकडे कोणत्याही स्थितीत व खेळपट्टीवर गोलंदाजी करण्याची कला आहे. आगामी टी-२० विश्वचषकात बुमरा सर्वोत्तम गोलंदाज असेल. त्यामुळे भारताला विश्वचषक जिंकण्याची उत्तम संधी निर्माण होईल,” असे फिलँडर म्हणाला.

इंग्लंडमुळे कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा रंगत -बोथम

इंग्लंडने बॅझबॉल शैलीद्वारे कसोटी क्रिकेटमध्ये एकप्रकारे रंगत निर्माण केली. त्याला नवसंजीवनी दिली, असे मत इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू इयान बोथम यांनी नोंदवले. “कसोटी सामने चार दिवस करण्याचा प्रस्ताव इंग्लंडनेच मांडला होता. याबाबतीत त्यांनी आतापर्यंत सकारात्मक खेळ करून दाखवला आहे. कसोटी सामने पाहण्यासाठी चाहते पुन्हा स्टेडियम गाठत आहेत. कारण सामन्यांचा निकाल लागत असून त्यांचे मनोरंजनही होत आहे. इंग्लंडने आक्रमक शैलीद्वारे यामध्ये मोलाचे योगदान दिले,” असे बोथम म्हणाले.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल