क्रीडा

FIFA Club World Cup : चेल्सीने पीएसजीला पराभूत करत पटकावले विजेतेपद

सामन्याच्या ८४ व्या मिनिटाला मार्क कुकुरेल्लाचे केस ओढून त्याला पाडल्यामुळे जो नेव्सला रेड कार्ड दाखवण्यात आले. सामन्याच्या अखेरच्या काही वेळात ६ यलो कार्ड दाखवण्यात आले. पॅरिस सेंट-जर्मनचे प्रशिक्षक लुईस इनरिक आणि डोनारुमा यांनी सेंट्रल सर्कल जवळ जो पेड्रोला धक्का दिल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. अखेर...

Krantee V. Kale

इस्ट रुदरफोर्ड : स्वत: केलेले दोन गोल आणि एका गोलसाठी जो पेड्रोला पास करत कोल पाल्मरने चेल्सीच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. क्लब विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चेल्सीने पॅरिस सेंट - जर्मनला (पीएसजी) ३-० ने पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली.

२२ व्या आणि ३० व्या मिनिटाला पाल्मरने डाव्या पायाने पेनल्टी भागातून गोल करत चेल्सीला आघाडी मिळवून दिली. पाल्मरने ४३ व्या मिनिटाला केलेल्या पासवर जो पेड्रोने अप्रतिम गोल करत चेल्सीला मोठी आघाडी मिळवून दिली.

दोन वर्षांपूर्वी मँचेस्टर सिटीला अलविदा करून चेल्सीच्या ताफ्यात दाखल झालेल्या २३ वर्षीय पाल्मरने यंदाच्या हंगामात १८ गोल केले आहेत.

सामन्याच्या ८४ व्या मिनिटाला मार्क कुकुरेल्लाचे केस ओढून त्याला पाडल्यामुळे जो नेव्सला रेड कार्ड दाखवण्यात आले. सामन्याच्या अखेरच्या काही वेळात ६ यलो कार्ड दाखवण्यात आले. पॅरिस सेंट-जर्मनचे प्रशिक्षक लुईस इनरिक आणि डोनारुमा यांनी सेंट्रल सर्कल जवळ जो पेड्रोला धक्का दिल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. अखेर दोन्ही संघांना वेगळे करावे लागले. लीग १, द कप दे फ्रान्स आणि चॅम्पियन लीग जिंकल्यानंतर चौथ्या स्पर्धेत विजेतेपद पटकवण्याचा पीएसजीचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

८१,१८८ प्रेक्षक जमा

अंतिम सामन्यावेळी स्टेडियममध्ये ८१,१८८ इतक्या मोठ्या संख्येने प्रेक्षक जमा झाले होते. त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही होते. तसेच कबड्डीतील दिग्गज खेळाडू, प्रमुख पाहुणे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल