Commonwealth Games 2026 Para Athletics : पॅरा गोळाफेकमध्ये सोमण राणाने जिंकले सुवर्णपदक 
क्रीडा

Commonwealth Games 2026 Para Athletics : पॅरा गोळाफेकमध्ये सोमण राणाने जिंकले सुवर्णपदक

राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ मध्ये शनिवारी भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी नोंदवली. पुरुषांच्या एफ-५७ पॅरा गोळाफेक प्रकारात भारताच्या सोमण राणाने सुवर्णपदक पटकावले, तर तिहेरी उडी शर्यतीत प्रवीण चित्रवेलने रौप्य आणि सेल्वा प्रभू तिरुमारनने कांस्यपदक जिंकले.

Swapnil S

ग्लासगो : राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ मध्ये शनिवारी भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी नोंदवली. पुरुषांच्या एफ-५७ पॅरा गोळाफेक प्रकारात भारताच्या सोमण राणाने सुवर्णपदक पटकावले, तर तिहेरी उडी शर्यतीत प्रवीण चित्रवेलने रौप्य आणि सेल्वा प्रभू तिरुमारनने कांस्यपदक जिंकले.

पुरुषांच्या एफ-५७ पॅरा गोळाफेक स्पर्धेत २०२२ च्या आशियाई पॅरा रौप्यपदक विजेत्या सोमण राणाने १३.४० मीटरची या हंगामातील सर्वोत्तम फेक करत पोडियमवर अव्वल स्थान मिळवले. याच प्रकारात भारताच्या शुभम जुयालने १३.२८ मीटर कामगिरीसह रौप्यपदक आपल्या नावे केले, तर कॅमेरूनच्या सेड्रिक आझमजीने १२.५७ मीटर फेकीसह कांस्यपदक जिंकले.

तिहेरी उडी शर्यतीत आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या प्रवीण चित्रवेलने १६.५८ मीटर अंतर गाठत रौप्यपदकावर मोहर उमटवली. त्याचाच साथीदार सेल्वा प्रभू तिरुमारन १६.५२ मीटर कामगिरीसह कांस्यपदकाचा मानकरी ठरला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेल्वा प्रभूचे हे पहिलेच महत्त्वाचे पदक ठरले आहे. या प्रकारात जमैकाच्या जॉर्डन स्कॉटने १६.७२ मीटर उडी मारून सुवर्णपदक पटकावले.

दिवसाच्या सुरुवातीला पॅरा अ‍ॅथलेटिक्स प्रकारातील पुरुषांच्या टी-५४ प्रकाराच्या १५०० मीटर अंतिम फेरीत भारताचा रमेश षण्मुगम ३:२३.५९ वेळेसह सातव्या स्थानावर राहिला. महिलांच्या १०००० मीटर रेसवॉकमध्ये प्रियंका गोस्वामीने ४५:५३.९३ अशी हंगामातील सर्वोत्तम वेळ नोंदवूनही तिला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. याच शर्यतीतील दुसरी भारतीय अॅथलीट रवीन हिला अयोग्य ठरवून बाद करण्यात आले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : ‘शताब्दी’ला एनएबीएच मानांकन; पालिकेचे पहिले सामान्य रुग्णालय ठरले

Pune : बनावट कॉल सेंटरवर ईडीची कारवाई

कोल्हापूर-मिरज-पुणे मार्गावरील प्रवाशांची तक्रार; जनरलच्या डब्यात 'पार्सल'वाल्यांची घुसखोरी

FSSAI ची नेस्ले इंडियावर कायदेशीर कारवाई; नियमांचे पूर्ण पालन केल्याचा कंपनीचा दावा

मुंढवा शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरण : पार्थ पवारांविरुध्द गुन्ह्यासाठी याचिका